ज्ञानासाठी कला हा सिद्धांत प्रस्थापित होण्याची गरज : लक्ष्मीकांत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:02 AM2018-09-27T01:02:30+5:302018-09-27T01:03:09+5:30

कलाक लेसाठी हा विचार मागे पडला आहे. याबरोबरच जीवनासाठी कला हा विचारही मान्य होत चालला आहे. बोधी नाट्य परिषदेकडून कलेच्या संदर्भात मांडण्यात आलेला नवा सिद्धांत कौतुकास्पद असून ‘ज्ञानासाठी कला’ हा विचार प्रस्थापित होण्याची खरी गरज भविष्यात आहे,

The need for art theory to be established: Laxmikant Deshmukh | ज्ञानासाठी कला हा सिद्धांत प्रस्थापित होण्याची गरज : लक्ष्मीकांत देशमुख

ज्ञानासाठी कला हा सिद्धांत प्रस्थापित होण्याची गरज : लक्ष्मीकांत देशमुख

Next

नाशिक : कलाक लेसाठी हा विचार मागे पडला आहे. याबरोबरच जीवनासाठी कला हा विचारही मान्य होत चालला आहे. बोधी नाट्य परिषदेकडून कलेच्या संदर्भात मांडण्यात आलेला नवा सिद्धांत कौतुकास्पद असून ‘ज्ञानासाठी कला’ हा विचार प्रस्थापित होण्याची खरी गरज भविष्यात आहे, असे प्रतिपादन बडोदा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.  निमित्त होते, मंगळवारी (दि.२५) परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित तिसऱ्या बोधिकला संगितीच्या उद्घाटनाचे. राज्य शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळ व बोधी नाट्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बोधिकला संगितीच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून देशमुख बोलत होते. विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य-संस्कृती मंडळाचे सदस्य शशिकांत सावंत, अशोक हांडोरे, राज बाळदकर, भगवान हिरे उपस्थित होते.  हांडोरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुरेश मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान,‘मराठी साहित्यातील वैचारिकता’ या विषयावर परिसंवाद रंगला.  अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अनिल सपकाळ होते, तर देवेंद्र उबाळे, मुकुंद कुलकर्णी, डॉ. अलका शिंदे-पवार, हरीश इथापे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, चंद्रकांत महामिने, डॉ. बी. जी. वाघ, कवी किशोर पाठक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रंगले काव्यकार संमेलन व कथाकथन सत्र
मनाला भिडणाºया कथा व समाज आणि व्यवस्थेबाबतच्या सत्य परिस्थितीचे चित्रण करणाºया कवितांनी वास्तववादाचे चित्रण करत बोधी कला संगितीच्या दुसºया सत्रात बुधवारी (दि. २६) औरंगाबादकर सभागृहात कपूर वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली काव्यकार संमेलन रंगले. थेट मानवी वृत्तीचे दर्शन घडणाºया साहित्यकृतींनी प्रेक्षकांना अंर्तमुख केले. सोबतच समानतेसाठी विद्रोही भूमिकाही ताकदीने मांडण्यात काव्यकार यशस्वी ठरले. कथाकथनाचा कार्यक्र म ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सुरु वातीला लेखक नंदिकशोर साळवे यांनी ‘डंका’ या कथासंग्रहातील ‘थुंकी’, तृतीय पंथीयांच्या आयुष्याची लढाईवर प्रकाश टाकणारी अस्तित्वाची लढाई ही कथा जयश्री बागुल यांनी सादर केली. तर ‘बेवारस’ ही कथा कथाकार रोहित पगारे यांनी सांगितली.

Web Title: The need for art theory to be established: Laxmikant Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.