परिवर्तनाच्या लढाईत तरुणाईच्या विवेक जागृतीची गरज, श्रीकृष्ण कोकाटे यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 05:13 PM2018-01-15T17:13:58+5:302018-01-15T20:17:30+5:30

तरुण पिढीने कोणतीही कृती करताना आपला विवेक जागृत ठेवणे आवश्यक असून सामाजिक परिवर्तनाची लढाई जिंकण्यासाठी तरुणाईचा विवेक जागा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.

 The need of awakening youths in the transformational battle is the need of Shrikrishna Kokate | परिवर्तनाच्या लढाईत तरुणाईच्या विवेक जागृतीची गरज, श्रीकृष्ण कोकाटे यांचे प्रतिपादन

परिवर्तनाच्या लढाईत तरुणाईच्या विवेक जागृतीची गरज, श्रीकृष्ण कोकाटे यांचे प्रतिपादन

Next
ठळक मुद्देकिरकोळ गुन्ह्याचे परिणाम मोठेगुन्हेगारी दूर कऱण्यासाठी विवेक जागृतीची गरजविवेक विचार सप्ताहात श्रीकृष्ण कोकाटे यांचे प्रतिपादन

नाशिक : गुन्हा कुठलाही असो त्याची सुरुवात किरकोळ कारणामुळे होत असते, परंतु त्याचे परिणाम मात्र अतिशय मोठे असतात, त्यामुळे तरुण पिढीने कोणतीही कृती करताना आपला विवेक जागृत ठेवणे आवश्यक असून सामाजिक परिवर्तनाची लढाई जिंकण्यासाठी तरुणाईचा विवेक जागा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.
विवेकवाहिनी व विवेक युवा विचार सप्ताह समितीतर्फे विवेक युवा विचार सप्ताहाअंतगर्त क्रांतीवीर वसतराव नारायण नाईक महाविद्यालयात व्याख्यानेमालेचे दुसरे पुष्प गुंफताना नाशिकचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व स्वीकारावे. कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी आपल्याला शॉर्ट कट हवा असतो, यामुळे अनेकदा असा शॉर्ट कट निवडल्याने आपले नुकसान होते. त्यामुळे परीश्रम करून यश मिळविण्यासाछी प्रयत्न करतानाच विद्यार्थ्यांनी सायबर स्पेसचा वापर योग्य करणे गरजेचे आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार अनुसरले तर ते जीवनात परिवर्तन घडवून आणणे शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. युवापिढीसाठी इंटरनल सिक्युरिटी हा अतिशय महत्वाचा विषय सून तरुणानी याविषयावरही अभ्यास करणे गरजेचे आहे. भारताच्या 76 मुख्य जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद वाढलेला आहे. शासन ही शोषण करणारी यंत्रणा आहे असे वातावरण तयार करून तरुणांच्या मनात ते बिंबवले जाते. त्यामुळे आपण यावर गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये मोटारसायकल चोरी आणि मालमत्तांसदर्भात गुन्हे ही अतिशय मोठी समस्या आहे. या विकृत मनोवृत्तीला समाजातून हद्दपार करण्यासाठीच तरुणाईचा विवेक जागृत करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या उद्दिष्टासाठी स्वतःला झोकून द्यायला हवे. सध्याच्या काळात 90% तरुणाईचा वेळ हा मोबाईलच्या चुकीच्या वापरात वाया जात आहे, तो त्यांनी नवनवीन संशोधनात्मक गोष्टींचा अभ्यास करण्यसाठी सत्कारणी लावावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी के.व्ही.एन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, प्राचार्य बडगुजर आदि उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश नखाते यांनी केले. सूत्रसंचालन किरण सोनवणे यांनी केले. शरद काकड यांनी आभार मानले, दरम्यान, क्रांतीवीर वसतराव नारायण नाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भित्तीपत्रकाचेही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि आजचा तरुण या विषयावर भाष्य करणाऱ्या भित्तीपत्रकाचा यावेळी अनावरण करण्यात आले.

Web Title:  The need of awakening youths in the transformational battle is the need of Shrikrishna Kokate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.