समाजकेंद्रित होण्याची गरज:रावसाहेब कसबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:22 AM2018-06-04T00:22:46+5:302018-06-04T00:22:46+5:30
नाशिक : सध्याच्या स्थितीत लोक मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री होत असल्याने समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांच्या समस्या व अडचणींमध्ये वाढ होत असून, मानवाने आत्मकेंद्री न राहता समाजकेंद्री होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त के ले आहे.
नाशिक : सध्याच्या स्थितीत लोक मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री होत असल्याने समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांच्या समस्या व अडचणींमध्ये वाढ होत असून, मानवाने आत्मकेंद्री न राहता समाजकेंद्री होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त के ले आहे.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेतर्फे रविवारी (दि.३) राज्यस्तरीय ‘जाणीव पुरस्कार २०१७-१८’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर वीरमाता नीलाताई आमले, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे उपसंचालक डॉ. जालिंदर सुपेकर, माहिती तंत्रज्ञान संचालक श्रद्धा बेलसरे, उद्योजक अतुल वाघ आदी उपस्थित होते. रावसाहेब कसबे म्हणाले, समाजातील एक घटक व्यक्तिगतरीत्या भौतिक गरजांवर मोठ्या प्रमाणात खर्च करीत असताना दुसरा घटक मात्र पायाभूत सोयी-सुविधांपासूनही वंचित आहे. याचा विचार करून लोकांनी स्वयंस्फुर्तीने भौतिक गरजांवर मर्यादा आणण्याची गरज असल्याचे मत कसबे यांनी व्यक्त केले, तर समाजातील बोथट झालेल्या जाणिवा जागृत क रण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत श्रद्धा बेलसरे यांनी व्यक्त केले, तर पुरस्काराला उत्तर देताना समाजातील विविध घटांक ांमध्ये मानुसकीच्या जाणिवेचा ओलावा जागृत होण्याची गरज उद्योजक उज्ज्वला हावरे, प्रकाश बोरकर, आर. विमला आदींनी व्यक्त केली. प्रास्ताविक अभियानचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले.
पुरस्कारार्थींचा सन्मान
समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीचा महाराष्ट्र राज्य जाणीव सांस्कृतिक अभियानतर्फे जाणीव पुरस्कारांनी करण्यात आला. यात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय एन. सूर्यवंशी, उद्योजक उज्ज्वला हावरे, नाशिक परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, महिला व बालविकास विभागाच्या सहायक आयुक्त सुवर्णा पवार, उद्योजक रेणुका पाटील,
हेल्प एज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता रामनाथ आरोटे, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती यतिंद्र पगार, डॉ. मनीषा जगताप, नागपूरच्या स्मार्ट सिटी प्रकल्पताचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर जळगाव वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सुभाष पाटील, जलसंपदाचे सहायक अभियंता दिलीप काळे, उद्योजक कैलास देवरे आदींचा जाणीव पुरस्काराने गौरव करण्यात आला.