भाजपा-सेनेला रोखण्यासाठी आघाडी आवश्यक : अजित पवार
By Admin | Published: February 2, 2017 01:34 AM2017-02-02T01:34:20+5:302017-02-02T01:34:36+5:30
राष्ट्रवादी कॉँग्रेस मेळावा : निवडणुकीच्या पार्श्वभूमी रणनिती
नाशिक : आगामी निवडणुकीत सेना-भाजप या पक्षांना रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समविचारी पक्षांशी बोलणी करून आघाडी करणार असल्याचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते आज राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार जयवंतराव जाधव, नानासाहेब महाले, विश्वास ठाकूर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला शहराध्यक्ष सुनीता निमसे, कविता कर्डक, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, अर्जुन टिळे, मुक्तार शेख, बालम पटेल, अमृता पवार, निजाम कोकणी, माजी शहराध्यक्ष गजानन शेलार, शरद कोशिरे, नगरसेवक रंजना पवार, वैशाली दाणी, संजय साबळे, राजेंद्र महाले, शोभा आवारे, आदि उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या कार्यअहवालाचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कौतुक करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याप्रसंगी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या आपल्या कामाचा अहवाल अजित पवार यांना सादर करून नाशिक शहरात युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जनतेच्या
विविध प्रश्नांना वाचा फोडून ती सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. याप्रसंगी निवृत्ती अरिंगळे, भारत जाधव, वैभव देवरे, प्रियंका शर्मा, अमोल महाले, रामू जाधव, दत्ताकाका पाटील, जहीर शेख, ज्ञानेश्वर पवार, सुरेखा निमसे, बाळासाहेब जाधव, शंकरराव पिंगळे, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, किशोर शिरसाठ, मकरंद सोमवंशी, विजय तुपलोंढे, मीरा शिंगोटे, कोमल साळवे, पुष्पा राठोड आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)