व्यवसाय बदलणे गरजेचे : चकोर गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:21 AM2019-03-28T00:21:20+5:302019-03-28T00:21:48+5:30

बदल हा निसर्गाचा नियम आहे. ग्राहक बदलला आहे, ग्राहकांची मानसिकता बदलली आहे. पैसे देण्याची पद्धत बदलली आहे. आॅनलाइन खरेदी वाढली आहे,

 Need to change business: Chakor Gandhi | व्यवसाय बदलणे गरजेचे : चकोर गांधी

व्यवसाय बदलणे गरजेचे : चकोर गांधी

Next

नाशिक : बदल हा निसर्गाचा नियम आहे. ग्राहक बदलला आहे, ग्राहकांची मानसिकता बदलली आहे. पैसे देण्याची पद्धत बदलली आहे. आॅनलाइन खरेदी वाढली आहे, मॉल आले आहे त्यामुळे व्यापारी-उद्योजकांनीही बदल केला पाहिजे. काळानुरूप बदल ही गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्टय व्यावसायिक मार्गदर्शकचकोर गांधी यांनी केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या नाशिक शाखेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व प्रमुख पाहुणे म्हणून दिवाण हौसिंग फायनान्सचे संचालक राजेंद्र मेहता, एसकेडी कन्सल्टंट्सचे अध्यक्ष संजय देवरे, चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमिती कामत, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, ललित गांधी, आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष रामचंद्र भोगले, कार्यक्र माच्या समन्वयक सुनीता फाल्गुने उपस्थित होते.
उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. मिथिला कापडणीस व सुरेश चावला यांनी केले, तर आभार सुनीता फाल्गुने यांनी मानले. यावेळी माजी अध्यक्ष रामचंद्र भोगले यांची अपेडाच्या संचालकपदी
निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे राजेंद्र मेहता, अंकुर सुराणा यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विश्वस्त खुशालभाई पोद्दार, कैलास खंडेलवाल, विलास शिरोरे आदी उपस्थित होते.
महत्त्वाचे कार्य
चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी अध्यक्षीय भाषणात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच महाराष्ट्र चेंबरने व्यापार उद्योग वाढीसाठी केलेल्या कार्याची माहिती देऊन गेल्या दोन वर्षांत राज्यात, देशात व परदेशातही व्यापार-उद्योग वाढीचे महत्त्वाचे कार्य केल्याचे मंडलेचा यांनी सांगितले.

Web Title:  Need to change business: Chakor Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.