आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज! कौटुंबिक सुसंवाद, खुली मैत्री; अभिव्यक्तीवर द्यावा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:29 AM2017-09-10T01:29:04+5:302017-09-10T01:29:17+5:30
सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, कमी होत चाललेला कुटुंबातला संवाद, शिक्षण-नोकरीत वाढती जीवघेणी स्पर्धा, वरवरची मैत्री, अतिधाडसीपणात झालेली वाढ, नकार पचवण्याच्या संस्काराचा अभाव आदी कारणांमुळे आज लहानांपासून वृद्धांपर्यंत आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.
नाशिक : सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, कमी होत चाललेला कुटुंबातला संवाद, शिक्षण-नोकरीत वाढती जीवघेणी स्पर्धा, वरवरची मैत्री, अतिधाडसीपणात झालेली वाढ, नकार पचवण्याच्या संस्काराचा अभाव आदी कारणांमुळे आज लहानांपासून वृद्धांपर्यंत आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.
सामूहिक प्रयत्नांनी हे प्रमाण आटोक्यात आणणे गरजेचे असून त्यासाठी पालक, शिक्षक व मित्रमंडळींनी खास प्रयत्न करणे गरजेचे आहे. ब्ल्यू व्हेल गेमचा विळखा, शेतीतील अपयश, शिक्षण-नोकरी, कामधंद्यातील अपयश, कर्जबाजारी, मानसिक छळ आदी विविध कारणांमुळे आत्महत्या वाढत आहेत. आत्महत्येपर्यंत टोकाची भूमिका न घेता आपल्या भावनांना वेळीच मोकळी वाट करून द्यावी, तज्ज्ञांची मदत घेत स्वत:च्या मनातील गुंता सोडवावा, असा सूर शहरातील मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.