नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सामूहिक आंदोलनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:15 AM2021-07-29T04:15:22+5:302021-07-29T04:15:22+5:30

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, गोदावरी, दक्षिण गंगा ही सहा राज्यांची जीवनदायिनी आहे. ती स्वच्छ राहावी यासाठी गेल्या ...

The need for a collective movement for the revival of rivers | नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सामूहिक आंदोलनाची गरज

नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सामूहिक आंदोलनाची गरज

Next

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, गोदावरी, दक्षिण गंगा ही सहा राज्यांची जीवनदायिनी आहे. ती स्वच्छ राहावी यासाठी गेल्या १२ वर्षांपासून नाशिकच्या नमामि गोदा फाैंडेशनच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. भारताचे जलपुरुष म्हणून ओळख असलेले डॉ. राजेंद्र सिंह यांनी तर गोदावरी काशी स्वच्छ होऊ शकते, असा संदेश दिला आहे. भारतीय लोक नदीला माता मानतात. गोदावरी ही भारतातील महत्त्वाची नदी आहे आणि ज्या नदीला आपण जीवनदायिनी किंवा माता मानतो, तिला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. मध्यंतरी श्री श्री रविशंकर हे नाशिकला आले होते आणि गोदावरीची परिस्थिती पाहून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. ज्या नदीवर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प आहेत, अशा नदीचे संवर्धन हे लोकचळवळीतून झाले पाहिजे. महाराष्ट्रालाच नाही, तर सबंध भारताला आंदोलनांचा इतिहास आहे. आपण विविध मुद्द्यांवर आंदोलने करत असतो. त्यामुळे आता भारतातील सर्व नद्या स्वच्छ करण्यासाठी देखील सामूहिक आंदोलन उभारण्याची गरज आहे, असेही भुजबळ म्हणाले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, गायक शंकर महादेवन, नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, नियंत्रक वैधमापनशास्त्र रवींद्र सिंघल, नमामि गोदा फाैंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे मान्यवर उपस्थित होते.

(फोटो २८ भुजबळ)

Web Title: The need for a collective movement for the revival of rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.