मासिक पाळी विषयीचे गैरसमज दूर करण्याची गरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:11 AM2021-06-03T04:11:34+5:302021-06-03T04:11:34+5:30
आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने संगिनी महिला जागृती मंडळ आणि पुण्यातील मासूम या संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरी निबंध, ...
आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने संगिनी महिला जागृती मंडळ आणि पुण्यातील मासूम या संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरी निबंध, कविता आणि चित्रातून भावना व्यक्त केल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. यावेळी निलांगी सरदेशपांडे यांनी मासिक पाळी ही निसर्गाची रचना आहे व ती पुढील पिढी घडवण्यासाठी केलेली आहे, असे सांगितले तर प्राची सूर्यवंशी यांनी तृतीय पंथीयांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. मासूमचे युवा संघटक योगेश धेंडे व अंकिता देवकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक सोनाली सुतार यांनी केले सूत्रसंचालन जयश्री नलगे यांनी तर आभार प्रदर्शन अभिजित कुंभारकर यांनी मानले.
इन्फो.
स्पर्धेतील विजेते
राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत मोठ्या गटात राहुल घराट, तर लहान गटात समीक्षा शितोळे, निबंध स्पर्धेत मोठ्या गटात विजया पाडेकर, तर लहान गटात ऋतुजा जोशी, कविता लेखन स्पर्धेत लहान गटात श्रद्धा माटल, मोठ्या गटात वैष्णवी सानप यांनी बक्षीस पटकावले.