शेतकऱ्यांना शेती नव्हे मार्केटिंग शिकविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:34 AM2019-01-18T00:34:12+5:302019-01-18T00:34:48+5:30

कृषिप्रधान देश म्हणवणाºया भारतात शेतकरी कायम गरीबच राहिला आहे. शेतीविषयी कोणतीही प्रात्यक्षिक माहिती नसलेले व्यावसायिक आणि अधिकारी शेतकºयांना शेती करायला शिकवतात. त्यातही ते उत्पादन वाढविण्याचाच सल्ला देतात. मात्र उत्पादित मालाचे काय करायचे, तो कोठे विकायचा याविषयी कोणीही माहिती देत नाही. त्यामुळे देशातील शेतकºयांना शेती कशी करायची ते नाही, तर उत्पादित मालाची मार्के टिंग कशी करायची ते शिकवायला हवे, असे प्रतिपादन पुण्यातील मूळशी येथील अभिनव शेतकरी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी केले.

 The need to educate farmers about not marketing agriculture | शेतकऱ्यांना शेती नव्हे मार्केटिंग शिकविण्याची गरज

स्टार व्याख्यानमालेत बोलताना पुण्यातील मूळशी येथील अभिनव शेतकरी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके. व्यासपीठावर संगीता टाकळकर, शीतल पवार, अलका गाजरे, चंद्रकांत धामणे, विजय डोंगरे, शांताराम आहिरे, निरंजन ओक, मिलिंद चिंधडे, सुनील गायकवाड आदी.

Next
ठळक मुद्देबोडके : रचना विद्यालय सुवर्ण महोत्सवी स्टार व्याख्यानमालेत प्रतिपादन

नाशिक : कृषिप्रधान देश म्हणवणाºया भारतात शेतकरी कायम गरीबच राहिला आहे. शेतीविषयी कोणतीही प्रात्यक्षिक माहिती नसलेले व्यावसायिक आणि अधिकारी शेतकºयांना शेती करायला शिकवतात. त्यातही ते उत्पादन वाढविण्याचाच सल्ला देतात. मात्र उत्पादित मालाचे काय करायचे, तो कोठे विकायचा याविषयी कोणीही माहिती देत नाही. त्यामुळे देशातील शेतकºयांना शेती कशी करायची ते नाही, तर उत्पादित मालाची मार्के टिंग कशी करायची ते शिकवायला हवे, असे प्रतिपादन पुण्यातील मूळशी येथील अभिनव शेतकरी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी केले.
रचना विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त परशुराम साइखेडकर नाट्यगृहात गुरुवारी (दि.१७) स्टार व्याख्यानमालेत ‘अल्पभूधारक शेतकºयांसाठी शेतकी क्षेत्रातील उत्क्रांती’ विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे, मुख्याध्यापक संगीता टाकळकर, विजय डोंगरे, शांताराम आहिरे, निरंजन ओक, मिलिंद चिंधडे, सुनील गायकवाड, शीतल पवार, अलका गाजरे आदी उपस्थित होते. दरम्यान, विविध क्रीडा व शैक्षणिक स्पर्धेत यशाबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुधाकर साळी यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहल देशपांडे यांनी केले. शांताराम अहिरे यांनी आभार मानले.

Web Title:  The need to educate farmers about not marketing agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.