रोगप्रतिकारशक्ती सक्षम करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:23 AM2017-09-26T00:23:56+5:302017-09-26T00:24:05+5:30

मागील काही दिवसांपासून शहराचे नैसर्गिक वातावरण कमालीचे बदलले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरेसे ऊनही पडत नसून पाऊसही पडत नसल्याचे चित्र आहे. ढगाळ हवामानही कायम असून, वातावरणात विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. याबरोबरच स्वाइन फ्लू, डेंग्यूनेही डोके वर काढले आहे. सध्या या आजारांची लागण व प्रभाव तीव्र स्वरूपात दिसून येण्याचे मुख्य कारण म्हणजे बदलत्या जीवनशैलीमुळे चुकीच्या आहाराची निवड. परिणामी कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती असल्याचा सूर तज्ज्ञांनी काढला आहे.

 The need to enable immunity | रोगप्रतिकारशक्ती सक्षम करण्याची गरज

रोगप्रतिकारशक्ती सक्षम करण्याची गरज

googlenewsNext

नाशिक : मागील काही दिवसांपासून शहराचे नैसर्गिक वातावरण कमालीचे बदलले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरेसे ऊनही पडत नसून पाऊसही पडत नसल्याचे चित्र आहे. ढगाळ हवामानही कायम असून, वातावरणात विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. याबरोबरच स्वाइन फ्लू, डेंग्यूनेही डोके वर काढले आहे. सध्या या आजारांची लागण व प्रभाव तीव्र स्वरूपात दिसून येण्याचे मुख्य कारण म्हणजे बदलत्या जीवनशैलीमुळे चुकीच्या आहाराची निवड. परिणामी कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती असल्याचा सूर तज्ज्ञांनी काढला आहे. स्वाइन फ्लू या आजाराचे विषाणू श्वासमार्गाने मानवी शरीरात प्रवेश करतात, तर डेंग्यूचे विषाणू ‘एडिस’ जातीच्या डासाच्या डंखातून मानवी शरीरात येतात. या दोन्ही आजारांची लक्षणे वेगवेगळी असली तरी काही लक्षणे समान आढळतात. वातावरणात स्वाइन फ्लूचा विषाणू सहा तासांपेक्षा अधिक काळ टिकून राहत नाही; मात्र या दरम्यान, स्वाइन फ्लू संसर्गजन्य व्यक्तीच्या संपकर् ात निरोगी व्यक्ती आल्यास त्याला लागण होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना हा प्रभावी उपचार ठरतो. स्वाइन फ्लू आणि सामान्य फ्लू यांची लक्षणे सुरुवातीला सारखीच जाणवत असली तरी स्वाइन फ्लूमध्ये घशामध्ये खवखव अधिक होणे, तीव्र स्वरूपाचा ताप चढणे, डोकेदुखी, पोटदुखी तर काहींना उलट्या-अतिसाराचाही त्रास संभवतो.  डेंग्यूची लागण झाल्यानंतर रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) झपाट्याने कमी होऊ लागतात. यामुळे शरीरात रक्त गोठण्याची क्रिया धोक्यात येऊन रक्तस्त्राव होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या दोन्ही आजारांचे शहरात प्रमाण वाढत आहे. या आजारांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती अशक्त असल्याचे मुख्य कारण आहे. ज्यांची रोगप्रतिकारकशक्तीच अशक्त झाली आहे, त्यांना विषाणुजन्य आजारांचा धोका अधिक असतो. रोगप्रतिकारक शक्ती खालवण्यामागे प्रतिजैविक औषधे घेणे हे एक महत्त्वाचे कारण ठरते.
डेंग्यू व स्वाइन फ्लू हे आजार आयुर्वेदशास्त्रानुसार विषमज्वर प्रकारात येतात. या आजारांवर विविध गुणकारी औषधी वनस्पतींचा काढा, चूर्ण, धनवटी आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहेत. षडंगउदक, त्रिभुवनकीर्ती, महासुदर्शन चूर्ण / धनवटी तसेच गुळवेल काढा असे विविध औषधोपचार उपलब्ध असल्याचे वैद्य जय कुलकर्णी यांनी सांगितले. वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधे घेत पथ्ये पाळल्यास आजार बरा होतो.  स्वाइन फ्लू व डेंग्यू या आजारांवर अ‍ॅलोपॅथीमध्ये बहुतांश औषधोपचार आहेत. डेंग्यूचा प्रभाव कमी झाला की रक्तबिंबिकांची संख्या वाढते. तसेच स्वाइन फ्लू या आजारामध्येही ताप, खोकला, पोटदुखी यांसारख्या त्रासांवर उपचार करून ते विविध औषधे देऊन आटोक्यात आणता येतात, असे डॉ. विजय गोगटे यांनी सांगितले. प्लेटलेट्स अर्थात रक्तबिंबिकांची संख्या वाढल्यानंतर रुग्ण बरा होतो. याकरिता प्रथम डेंग्यूचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच टॅमी फ्लू या औषधाने स्वाइन फ्लू नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वाइन फ्लू किंवा डेंग्यू हे दोन्ही आजार पसरण्याची कारणे वेगवेगळी आहेत; मात्र हे आजार विषाणूजन्य स्वरूपाचे असून, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाची ठरते. डेंग्यूची लागण झाल्यानंतर रक्तबिंबिकांची संख्या घटते तर स्वाइन फ्लू आजारात तीव्र ताप व खोकला आणि घशामध्ये खवखव होते. स्वाइन फ्लूचे विषाणू श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात. रात्री झोपताना भरपूर पाणी प्यावे व नाक स्वच्छ करावे. तसेच उकळले पाणी प्यावे, गर्दीच्या ठिकाणी वावर टाळावा आणि परस्पर औषधे घेऊ नये, अशी खबरदारी घ्यावी. रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी.  - डॉ. विजय गोगटे, फॅ मिली फिजिशीयन
स्वाइन फ्लू, डेंग्यू यांसारख्या विषाणूजन्य आजारांच्या तीव्रतेमध्ये वाढ होणे म्हणजे नागरिकांची खालावलेली रोगप्रतिकारकशक्ती होय. वेगवेगळे रोग वेगवेगळ्या नावाने समोर येत आहे; मात्र दुर्दैवाने रोगप्रतिकारक शक्ती सक्षम करण्याकडे कोणी लक्ष देत नाही किंवा तसे प्रयत्नही होताना दिसत नाही. पोषक आहार, दिनचर्या, ऋतुचर्या ही माणसाने पाळली पाहिजे. प्रतिजैविक औषधांचे सेवनही रोगप्रतिकारकशक्तीला क मकुवत करण्यामागे कारणीभूत ठरतात. नागरिकांनी शुद्ध हवा, पाणी, आहार घ्यावा.  - वैद्य विजय कुलकर्णी
स्वाइन फ्लू व डेंग्यू हे विषाणूजन्य आजार असून, डेंग्यू आजाराचे डास हे एक माध्यम आहे तर स्वाइन फ्लूचा विषाणू श्वासोच्छवासाद्वारे शरीरात प्रवेश करतो. या आजारांवर होमियोपॅथीमध्ये चांगले औषधोपचार उपलब्ध आहेत. विषाणूजन्य आजारांचे रुग्ण या औषधोपचाराने लवकर बरे होतात. होमियोपॅथी औषधांमुळे रुग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर कु ठलाही परिणाम होत नाही. त्यामुळे सदर आजार लवकर आटोक्यात येण्यास मदत होते.
- डॉ. योगेश कुलकर्णी

Web Title:  The need to enable immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.