ग्राम विकासासाठी एकत्र येण्याची गरज भास्कर पेरे : गिरणारे येथे ग्रामविकासाबाबत केले मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:58 PM2018-02-09T23:58:58+5:302018-02-10T00:29:04+5:30
नाशिक : गावातील मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवा. स्वच्छतेला अग्रक्र म द्या. सर्व घटकांना जोडणारे उपक्र म राबवा. गावाचा शाश्वत विकास हे ध्येय ठेवा.
नाशिक : गावातील मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवा. स्वच्छतेला अग्रक्र म द्या. सर्व घटकांना जोडणारे उपक्र म राबवा. गावाचा शाश्वत विकास हे ध्येय ठेवा. त्यासाठी गट, तट विसरून एकत्र या, असे आवाहन राज्याच्या आदर्श ग्राम समितीचे सदस्य व आदर्श गाव पाटोदाचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले. गिरणारे ग्रामपंचायतीतर्फे कृष्ण मंदिर पटांगणावर ‘ग्रामविकासासाठी एकत्र येऊ’ या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी पेरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अर्पणा खोसकर, पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंबळे, नाशिक महानगरपालिकेच्या महिला व शिक्षण समिती सभापती सरोज आहिरे, माजी सरपंच खंडेराव थेटे, महादूबाबा थेटे, निवृत्ती घुले, नाशिक तालुका शेतकी संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण हांडोरे, नाशिक बाजार समितीचे माजी संचालक राजाराम फडोळ, सरपंच अलकाताई दिवे, आत्माराम थेटे, अनिल थेटे, नितीन गायकर, महेंद्र थेटे उपस्थित होते. यावेळी स्वच्छतेतील उत्तम कामगिरीबद्दल अंबादास कापसे, ज्ञानेश्वर जाधव, बाळासाहेब थेटे, अनिल केदार, संजय सूर्यवंशी, आशा सूर्यवंशी, किरण थेटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हापातळीवर गणेशोत्सवात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बजरंग व महारु द्र या मंडळांना गौरविण्यात आले. प्रा. सोमनाथ घुले यांनी सूत्रसंचालन केले. नितीन कस्तुरे यांनी आभार मानले.