समाजमंदिरापेक्षा ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:37+5:302021-06-29T04:11:37+5:30

काेरोनाच्या काळात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याचबरोबर आपल्याकडील आरोग्य व्यवस्था किती अपुरी आहे याची जाणीवही झाली. पुरेसे बेड नाहीत, ...

The need for health care in rural areas rather than community centers | समाजमंदिरापेक्षा ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेची गरज

समाजमंदिरापेक्षा ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेची गरज

Next

काेरोनाच्या काळात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याचबरोबर आपल्याकडील आरोग्य व्यवस्था किती अपुरी आहे याची जाणीवही झाली. पुरेसे बेड नाहीत, औषधे नाहीत, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची कमतरता अशा एक नव्हे अनेक समस्या उभ्या तर होत्याच; परंतु सामाजिक प्रश्नही खूप होते. परदेशात तसेच राज्याराज्यांमध्ये मतदारसंघातील व्यक्ती अडकून पडल्याने त्यांची सोडवणूक करणे, नागरिकांना शासनाने देऊ केेलेल्या योजनांचा लाभ मिळतो की नाही, याचा पाठपुरावा करणे असे एक नव्हे अनेक कामे करावी लागली. हा सारा काळाच अजूनही पावलोपावली परीक्षा पाहत असून, तिसऱ्या लाटेला आमंत्रण द्यायचे की नाही, हे सर्वस्वी नागरिकांच्या हातात असल्याचेही खासदार डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

चौकट===

ड्रायपोर्ट, रूबन योजना, कार्गो सेवेला प्राधान्य

गेल्या दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यात पाच ठिकाणी एकलव्य शाळा मंजूर करण्यात आल्या असून, रूबन योजनेतून नांदगावला ७० कोटींचा प्रकल्प उभा राहत आहे. पेठला बायपास रस्ता तयार करण्यासाठी ८५ कोटींचा प्रस्ताव दाखल असून, मनमाड- नांदगाव रस्त्यांचे चौपदरीकरण, नाशिकहून दिल्लीसाठी राजधानी एक्स्प्रेस, दिल्ली विमानसेवा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेलनेस सेंटर, द्राक्ष क्लस्टर, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून शंभर कोटींच्या कामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर आहेत. शेतमाल पिकविणारा जिल्हा असल्यामुळे कार्गो सेवा सुरू करणे तसेच निफाडला ड्रायपोर्ट उभारण्याला नजीकच्या काळात प्राधान्य देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

Web Title: The need for health care in rural areas rather than community centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.