हरित नाशिकसाठी ‘दत्तक वृक्ष’ संकल्पना राबविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:29 AM2019-02-23T01:29:01+5:302019-02-23T01:29:34+5:30
एरवी कागदपत्रे आणि फाइलींचे ढिगारे, रस्ते पाणी गटारीच्या नागरिकांच्या तक्रारींसाठी होणारी गर्दी... महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील हे चित्र शुक्रवारी पालटले आणि फुला फळांनी भरलेल्या वास्तूचे जणू एखाद्या उद्यानात रूपांतर झाले.
नाशिक : एरवी कागदपत्रे आणि फाइलींचे ढिगारे, रस्ते पाणी गटारीच्या नागरिकांच्या तक्रारींसाठी होणारी गर्दी... महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील हे चित्र शुक्रवारी पालटले आणि फुला फळांनी भरलेल्या वास्तूचे जणू एखाद्या उद्यानात रूपांतर झाले. नाशिककर अभिनेत्री अनिता दाते यांच्या तर यापूर्वीच्या पुष्पोत्सवाच्या स्मृती जागृत झाल्या आणि हा पुष्पोत्सव यापुढे अखंड सुरूच ठेवू, असा शब्दच त्यांनी महापाालिकेकडून घेतला. त्याचबरोबर आपल्या शहरात निसर्गाची समृद्धी टिकून राहावी यासाठी केवळ एका यंत्रणेवर अवलंबून न राहता साऱ्यांनीच त्यात सहभागी व्हावे, असे सांगताना प्रत्यक्ष नाशिकच्या देवराईच्या संवर्धनासाठी आपण कोणत्याही मोबदल्याची अभिलाषा न बाळगता नियमित कार्यरत राहू असे सांगून त्यांनी सुखद धक्का दिला.
महापालिका राबविणार फार्मर्स मार्केट
नाशिक शहराच्या अवती-भोवती शेतकरी असून, ते चांगली शेती करतात तसेच भाजीपाला पिकवतात त्यांच्यासाठी सुटीच्या दिवशी फार्मर्स मार्केट योजना राबविण्याचा मानस महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केला. सिडकोत पेलिकन पार्कच्या जागी ३५ कोटी रुपये खर्च करून नवे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.