वाचन संस्कृती वाढविण्याची गरज : प्रांजली कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:20 AM2018-04-25T00:20:01+5:302018-04-25T00:20:01+5:30
आजच्या काळात पुस्तकांकडे वळावे हे सांगणे ही शोकांतिका आहे, असे प्रतिपादन प्रांजली कुलकर्णी यांनी केले. कॅम्प सार्वजनिक वाचनालयात पुस्तक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दिन साजरे करण्याऐवजी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले.
मालेगाव : आजच्या काळात पुस्तकांकडे वळावे हे सांगणे ही शोकांतिका आहे, असे प्रतिपादन प्रांजली कुलकर्णी यांनी केले. कॅम्प सार्वजनिक वाचनालयात पुस्तक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दिन साजरे करण्याऐवजी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले. प्रांजली कुलकर्णी म्हणाल्या, पुस्तक वाचनाची आवड व साहित्यिक मंडळींचा सहवास लाभल्याने लेखनासाठी त्याचा उपयोग झाला. वाचनाने कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती वाढते. मीडिया, मोबाइल, टीव्ही व पुस्तकवाचनातील फरक सांगताना टीव्ही, मोबाइलमुळे माणसे एककल्ली होतात व वाचनाने माणसाला माणूस व्हावेसे वाटते हे उदाहरणातून पटवून दिले. पुस्तके खरेदी करून वाचावी, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलनच्या नम्रता जगताप यांचेही भाषण झाले. दर रविवारी लहान मुलांसाठी वाचनालयात कार्यक्र म राबवून त्यांच्या मनावर चांगले संस्कार व्हावेत, असे प्रयत्न केले जातील असे त्यांनी सूचित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. मंगला देवरे यांनी शेक्सपियरच्या निवासस्थानाला भेट दिल्याचे सांगितले. पुस्तक मोठा गुरु आहे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश पहाडे, राजेंद्र भामरे, अनिता वाडेकर, किशोर शिंदे, कल्पेश सोनवणे, पूनम सोनपसारे, अनुष जाधव, वासुदेव विसपुते, समाधान शेजवळ, प्रशांत पवार, प्रीतेश सूर्यवंशी, ऋषिकेश देशमुख, पुष्पक पवार, संदीप जाधव, प्रफुल्ल गर्ग, अजय बडाळे, सुरेखा सोनवणे, प्रमोद भावसार, माया गाडेकर आदी उपस्थित होते. यावेळी बालवाचक शृंखल व जान्हवी देवरेचा पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सचिव रमेश उचित यांनी केले. आभार ग्रंथपाल रेखा उगले यांनी मानले.