कौशल्य विकासाला चालना देण्याची गरज : विजया वाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:12 AM2019-10-24T00:12:59+5:302019-10-24T00:13:36+5:30

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे गुणकौशल्य असतात, परंतु विविध शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जातात. त्यापेक्षा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुण कौशल्यांच्या विकासाला चालना देण्याची गरज असल्याचे प्र्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड यांनी केले आहे.

 Need to promote skill development | कौशल्य विकासाला चालना देण्याची गरज : विजया वाड

कौशल्य विकासाला चालना देण्याची गरज : विजया वाड

Next

नाशिक : प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे गुणकौशल्य असतात, परंतु विविध शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जातात. त्यापेक्षा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुण कौशल्यांच्या विकासाला चालना देण्याची गरज असल्याचे प्र्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड यांनी केले आहे.
कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षासह काकासाहेब वाघ यांच्या १२१व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. वाड यांनी ‘सुखाची सतरंजी’ विषयावर व्याख्यान दिले. व्यासपीठावर माजी खासदार माधवराव पाटील, वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, नाफेडचे माजी संचालक चांगदेव होळकर, एस. के. नाठे, समीर वाघ, प्राचार्य, पी. टी. कडवे, प्रा. के. एस बंदी आदी उपस्थित होते. डॉ. वाड म्हणाल्या, शिक्षण आणि प्रवेशप्र्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा भेदभाव दिसून येत असला शिक्षकांनी गुणवंत अणि कौशल्यपूर्ण विद्यार्थ्यांना मदत करून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. दरम्यान, काकासाहेब वाघ यांच्यासोबत काम केलेल्या विविध मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच काकासाहेब वाघ यांच्या जीवनावर आधारित ध्वनिचित्रफितीचेही यावेळी सादरीकरण करण्यात आले. प्र्रास्ताविक प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी केले.
सूत्रसंचालन स्वाती पवार यांनी केले.

Web Title:  Need to promote skill development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक