रांगोळी कलेच्या पुनरूज्जीवनाची गरज : रश्मी विसपुते
By संजय पाठक | Published: April 13, 2019 01:12 PM2019-04-13T13:12:34+5:302019-04-13T13:14:33+5:30
नाशिक- रांगोळी ही पांरपरिक कला! प्राचीन कलेल आता नव्याने उजाळा मिळू लागला आहे. अर्थातच त्यामागे रांगोळी कलाकारांचे परिश्रम देखील कारणीभूत आहेत. नाशिकच्या रश्मी विसपुते यांनी त्यात पुढे जाऊन भव्य रांगोळी साकारण्याचा विक्रम केला आहे. ७५ फुटाची भव्य गुढी रांगोळी साकारून विक्रम केला आहे. त्याची वंडरबुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून विसपुते यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल विसपुते यांच्याशी केलेली ही बातचीत.

प्रश्न- रांगोळी सारख्या कलेतून विक्रम साकारण्याची कल्पना कशी काय आली.
विसपुते: मला शालेय जीवनापासूनच चित्रकला आणि रांगोळीची आवड आहे.चित्रकलेत मी जीडी आर्ट नाशिकच्या कलानिकेतन मध्ये करीत आहेत. चित्रकलेचे ज्ञान आहेच, परंतु रांगोळी माझी मीच शिकले. त्याच्या संयोगातूच रांगोळी रेखाटण्याचे काम काही वर्षांपासून करते आहे. रांगोळी ही प्राचीन कला आहे त्याचे पुनरूज्जीवन करण्याचे मी ठरवले आणि त्यामुळेच रांगोळीतूनच विक्रम करण्याचे ठरविले होेते.
प्रश्न: गुढीची रांगोळी ही कल्पना कशी सुचली? त्यासाठी काय परिश्रम घेतले?
विसपुते: रांगोळी ही प्राचीन परंपरा आहे. तसेच गुढी पाढवा हा हिंदुचा सण आहे. त्यामुळे यानिमित्ताने भव्य गुढीच साकरण्याचे मी ठरविले. ७५ फुट गुढी साकारणे सोपे नव्हते. ती साकारण्याचे ठरविल्यानंतर मी दररोज दोन तास रांगोळी काढण्याचा सराव केला. रांगोळी काढताना सतत वाकून राहावे लागणार असल्याने पाठ दुखणे किंवा हात दुखणे होणारच होते. त्यामुळे विशेष दक्षता म्हणून योगासनेही केली. माझी बहीण वसुधा जानोरकर हीने योगासने शिकवले. त्यानंतर हा विक्रम करण्याचे ठरवले.
प्रश्न: तुमच्या भव्य रांगोळीची विक्रमात नोंद झाली, त्या बद्दल काय भावना आहेत?
विसपुते: रांगोळी सारख्या प्राचीन कलेल्या आधारे काही करू शकले याचा आनंद आहेच. परंतु हा विक्रम करण्यासाठी सर्वाधिक प्रोत्साहन माझ्या कुटूंबियांनी दिले. त्यांच्या पाठबळाशिवाय हे शक्यच नव्हते. याशिवाय वृंदाताई लव्हाटे यांनी हॉलसाठी जे सहकार्य केले, त्यामुळेच हा विक्रम करू शकले. आता आणखी मोठा विक्रम करण्याची गिनीज बुकासह अन्य विक्रमांत नोंद करण्याची इच्छा आहे. त्याच बरोबर रांगोळीचा प्रचार प्रसार देखील करणार आहे. पुर्वी घराबाहेर रांगोळी काढली जात असे. आता मात्र महिला नोकरदार झाल्या तसेच अन्य कारणांमुळे ही कला लोप पावत चालली आहे. त्यामुळे रांगोळीचा प्रसार देखील नजीकच्या काळात करणार आहे.
मुलाखत- संजय पाठक