जगन्नाथ चौकात सिग्नलची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:15+5:302020-12-14T04:30:15+5:30

वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत उपनगरे आहेत. त्याचबरोबर दिवसागणिक वाढणाऱ्या अपार्टमेंट व सोसायटीमुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ दिवसभर सुरू असते. या रस्त्यावरील ...

Need signal at Jagannath Chowk | जगन्नाथ चौकात सिग्नलची गरज

जगन्नाथ चौकात सिग्नलची गरज

Next

वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत उपनगरे आहेत. त्याचबरोबर दिवसागणिक वाढणाऱ्या अपार्टमेंट व सोसायटीमुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ दिवसभर सुरू असते. या रस्त्यावरील जगन्नाथ चौकात चार मुख्य रस्ते येतात. यामध्ये इंदिरानगरकडून, दुसरा रस्ता शरयू नगर पांडव नगरी, तिसरा रस्ता पाथर्डी गाव पाथर्डी फाटा आणि चौथा रस्ता वासन नगर मुंबई महामार्ग असे चार रस्ते येतात. त्यामुळे पुणे व मुंबई महामार्ग तसेच अंबड औद्योगिक वसाहत जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते; परंतु जगन्नाथ चौकात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही उपाययोजना न करण्यात आल्याने लहान-मोठे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी योगेश दिवे, विश्वनाथ पवार, दिलीप नागरे, पोपट डावरे, राजू चव्हाण, संजय जाधव, अरुण पवार, तुळशीराम पाटील, संजय लोखंडे, लक्षीमन गोरे, मोतीराम सोनवणे, ज्ञानेश्वर शिंदे, रामपाल परदेशी, शंकर शिंदेसह नागरिकांनी केली आहे.

Web Title: Need signal at Jagannath Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.