गरिबांना मारणाऱ्या विकासाविरोधात उभे राहण्याची गरज : चर्चासत्रातील सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 01:25 AM2020-08-21T01:25:55+5:302020-08-21T01:26:16+5:30
संविधानप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन धर्मांध, जातीयवादी, गरिबांना मारणाºया विकासाच्या विरोधात उभे राहण्याची गरज निर्माण झाली असल्याचा सूर महाराष्ट्र सोशल फोरमच्या चर्चासत्रातला गुरुवारी (दि. २०) आॅनलाइन चर्चासत्रात उमटला.
नाशिक : संविधानप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन धर्मांध, जातीयवादी, गरिबांना मारणाºया विकासाच्या विरोधात उभे राहण्याची गरज निर्माण झाली असल्याचा सूर महाराष्ट्र सोशल फोरमच्या चर्चासत्रातला गुरुवारी (दि. २०) आॅनलाइन चर्चासत्रात उमटला.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज सात वर्ष पूर्ण झाली; पण त्यामागचे सूत्रधार अजून पकडले गेले नाही, म्हणून त्याचा निषेध व्यक्त करीत आजचा हा दिवस डॉ. दाभोळकर यांना समर्पित करून महाराष्ट्र सोशल फोरमच्या कार्याची सुरुवात झाली. यात महाराष्ट्रातल्या तीस जिल्ह्यांमध्ये आॅनलाइन बैठका झाल्या. संबंधित जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने धोरण स्वीकारावे, असे ठराव मांडले गेले. त्यानंतर भंडाºयाचे अविल बोरकर, गडचिरोलीच्या शुभदा देशमुख, नागपूरचे डॉ. प्रमोद मुनघाटे, धुळ्याच्या अश्विनी जाधव, मुंबईचे संदेश लाळगे, साताºयाचे अशोक भालेराव, सांगलीच्या संग्राम संस्थेचे शशिकांत माने आणि परभणीवरून लता आणि सारंग साळवी यांनी त्यांचे प्रश्न मांडले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक अविनाश पाटील यांनी देशात चाललेल्या वातावरणाला उत्तर देण्यासाठी आवश्यक असणारी कायदे साक्षरता करून युवकांच्या शक्तीला रचनात्मक कामासाठी आणि त्यानिमित्ताने देशाच्या जडणघडणीत सहभागी करून घेण्याचा विचार मांडला. मासूम संस्थेच्या संस्थापक डॉ. मनीषा गुप्ते यांनी एकत्रित चळवळीची गरज व्यक्त केली.
लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी स्वतंत्र विचार मांडणाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. नितीन मते व अनिता पगारे यांनी संयोजन केले.
लोकशाही दडपण्यासाठी लॉकडाऊनचा उपयोग
सत्तेत असलेल्या शक्तीकडून समाजात ठरवून भूक निर्माण केली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी या विचारसत्रात बोलताना केला. कोरोना ही संधी घेत लॉकडाऊनचा उपयोग उपचारासाठी न करता लोकशाहीला दडपण्यात केला गेल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
धार्मिक बहुसंख्याकवादाचा उन्माद : डॉ. मिन्झ
राजकीय अभ्यासक प्रा. झोया हसन यांनी देशात धार्मिक बहुसंख्याकवादाचा उन्माद वाढत असल्याची खंत व्यक्त केली तर डॉ. सोनलिहाजा मिन्झ यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे महिलांना हक्क मिळाले. पण अजूनही आदिवासी महिला शिक्षण आणि नोकºयांच्या संधीपासून मोठ्याप्रमाणावर वंचित असल्याची खंत व्यक्त केली.