सहकार चळवळ टिकविण्याची गरज : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 02:50 PM2020-01-31T14:50:52+5:302020-01-31T14:51:00+5:30
दिंडोरी : सहकार व शिक्षण यामुळेच समाजाची, राज्याची प्रगती झालेली आहे. यामुळे सहकार चळवण टिकणे ही काळाची गरज आहे. जिल्ह्यात व राज्यात अनेक दिग्गज साखर कारखाने बंद पडत असताना कादवा कारखाना चांगल्या पद्धतीने सुरु असून हा राज्यातील सहकार क्षेत्रातील आदर्श आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
दिंडोरी : सहकार व शिक्षण यामुळेच समाजाची, राज्याची प्रगती झालेली आहे. यामुळे सहकार चळवण टिकणे ही काळाची गरज आहे. जिल्ह्यात व राज्यात अनेक दिग्गज साखर कारखाने बंद पडत असताना कादवा कारखाना चांगल्या पद्धतीने सुरु असून हा राज्यातील सहकार क्षेत्रातील आदर्श आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील कर्मवीर रास वाघ संस्था संचलित कादवा इंग्लिश स्कुलच्या नवीन इमारतीच्या उदघाटनप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले की, राज्यात अग्रगण्य असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक चुकीच्या लोकांच्या हाती गेल्याने तिची अवस्था आपल्या समोर आहे. त्यामुळे संस्था चालविण्यासाठी सक्षम नेतृत्वाच्या हाती सत्ता देण्याची जबादारी जनतेने व्यवस्थित पार पाडावी असे सांगितले. कादवा सहकारी साखर कारखान्याने केवळ उसाचे गाळप न करता परिसरातील शैक्षणिक गरज ओळखून कर्मवीर रा स वाघ शैक्षणिक आरोग्य संस्थेच्या निर्मितीमुळे परिसरात शैक्षणिक सुविधा ही चांगल्या होताना दिसत आहे. लखमापूर येथील इमारत हे त्याचेच उदाहरण आहे. या वेळी शाळेच्या पुढील बांधकामासाठी पन्नास लाख रु पयांचा निधी जाहीर करून भविष्यात शैक्षणिक कामासाठी लागणारा निधी देण्यासाठी सरकार नक्की प्रयत्न करेल असे आश्वासन ग्रामस्थांना दिलेले. यात जनतेचे योगदान ही मोलाचे आहे, विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेताना खेळ व किमान अंगभूत गुण यांना वाव देऊन शिक्षण घ्यावे. अपप्रवृत्तीला थारा न देता समाजाला आपण काही देणे लागतो या प्रमाणे आचरण आणि गरजेचे आहे. आपली भूमी साधू संतांची असून त्याचे आचरण व दिशा ठेऊन त्याच्या विचारातील महाराष्ट्र घडविण्याची जबादारी पार पाडावी असे आवाहन पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांना केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी करत शैक्षणिक संस्थेची व कारखान्याच्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील,बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, उपसभापती अनिल देशमुख, रवींद्र पगार, भास्कर भगरे, उपाध्यक्ष उत्तम भालेराव, सरपंच मंगल सोनवणे, उपसरपंच श्रीराम राजदेव, सुभद्रा देशमुख, ज्योती देशमुख, शालेय समतिीचे अध्यक्ष विश्वनाथ देशमुख, बाळासाहेब उगले उपस्थित होते सूत्रसंचालन प्राचार्य के.के. अहिरे यांनी केले.