घोटीत कोरोनाबाबत गांभीर्याने घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 06:00 PM2020-08-10T18:00:00+5:302020-08-10T18:01:06+5:30

घोटी:इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरात सोमवारी(दि.१०) कोरोना रु ग्णाबाबतची स्थितीत नियंत्रणात असून गेल्या चार महिन्यात १४८ रु ग्ण बाधित झाले होते, त्यात १२९ रु ग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान सद्यस्थितीला १४ बाधित रु ग्ण उपचार घेत आहे. घोटीसारखी बाजारपेठ व नागरिकांची वर्दळ असलेल्या शहरात तुलनेने ही स्थिती दिलासादायक आहे.

The need to take corona in the neck seriously | घोटीत कोरोनाबाबत गांभीर्याने घेण्याची गरज

घोटी येथील करोना आढावा बैठकीत बोलताना हिरामण खोसकर, सोबत उदय जाधव, जालिंदर पळे, डॉ देशमुख व अधिकारी वर्ग.

Next
ठळक मुद्देआढावा बैठकीत दिलासादायक स्थिती असल्याचे चित्र

घोटी:इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरात सोमवारी(दि.१०) कोरोना रु ग्णाबाबतची स्थितीत नियंत्रणात असून गेल्या चार महिन्यात १४८ रु ग्ण बाधित झाले होते, त्यात १२९ रु ग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान सद्यस्थितीला १४ बाधित रु ग्ण उपचार घेत आहे. घोटीसारखी बाजारपेठ व नागरिकांची वर्दळ असलेल्या शहरात तुलनेने ही स्थिती दिलासादायक आहे. दरम्यान घोटीत करोना बाधित रु ग्णस्थिती दिलासादायक असली तरी नागरिकांनी शासन निर्देशाच्या दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून करोनाचा वाढता प्रादुर्भाव गांभीर्याने घेण्याची गरज आहे. असे आवाहन आमदार हिरामण खोसकर यांनी केले.
घोटी ग्रामपालिका सभागृहात याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत घोटीतील नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालक करावे, सक्षम दुकानदारांनी टेम्पर्रेचर तपासणक्ष मशीन घेऊन वापरात आणावे, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आदींबाबत तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीयीकृत बँकामध्ये असणारी गर्दी चिंताजनक असल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांनीही याची दखल घेऊन ग्राहकांची कामे वेळेवर व तात्काळ करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे अनेकांनी मत नोंदवले.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब पवार, तहसीलदार परमेश्वर कासुळे, सहायक बिडीओ यंदे, सहायक निरीक्षक जालिंदर पळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, बाळासाहेब वालझाडे, चांदमल भन्साळी, ग्रामपालिका सदस्य स्वाती कडू, वैशाली गोसावी आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी रामदास धांडे, ग्रामपालिका सदस्य रामदास भोर, श्रीकांत काळे, सचिन गोंणके, संजय जाधव, गणेश गोडे नंदू पीचा , माजी सरपंच रामदास शेलार, नंदलाल शिंगवी, भास्कर गुंजाळ घोटी ग्रामीण रु ग्णालयाच्या डॉ. वैशाली ठाकरे ग्रामस्थ, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
 

Web Title: The need to take corona in the neck seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.