स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज : सच्चिदानंद शेवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:50 AM2018-05-29T00:50:07+5:302018-05-29T00:50:07+5:30
स्वातंत्र्य मिळाले नाही तर मिळविले असे तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे. परंतु, तरुणांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जात आहे. स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी सावरकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना केले.
नाशिक : स्वातंत्र्य मिळाले नाही तर मिळविले असे तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे. परंतु, तरुणांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जात आहे. स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी सावरकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना केले. गंगापूररोड येथील शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ‘सावरकर : एक झंझावात’ या विषयावरील आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. शेवडे यांनी सांगितले, आजची तरुण पिढी ही पूर्णत: सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. त्यामुळे त्यांच्यात नैराश्यभाव वाढत चालला आहे. हे नैराश्य घालविण्यासाठी त्यांनी सावरकर आणि शिवचरित्राचे वाचन केले पाहिजे. सावरकर हे जे बोलायचे तेच कृतीत आणायचे. आजच्या पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्यातून जीवन जगण्याची प्रेरणा घ्यायला हवी, परंतु चित्रपटातील नायक, नायिका यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यामुळे देशाची संस्कृती रसातळाला जायला वेळ लागणार नाही. समाजातील स्वत्व आणि अस्मिता संपली की समाजाचा ºहास सुरू होतो. राष्ट्राचा इतिहास शाईने नाही, तर क्र ांतिकारकांच्या रक्त, अश्रू आणि घामाने लिहिला जातो. जिथे आपली मान लवेल असे आपले आदर्श हवेत, परंतु आज पायावर डोके ठेवता येईल असे आदर्श व्यक्तिमत्त्वच उरले नसल्याची खंतही डॉ. शेवडे यांनी व्यक्त केली. दरम्यान, मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनीही सावरकरांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला. यावेळी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक विजय कदम, अक्षय जोग उपस्थित होते. सूत्रसंचालन पद्माकर देशपांडे यांनी केले. किरण शेलार यांनी आभार मानले.