शहरांमध्ये पाणी मुरविणे काळाची गरज : सुनील कुटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:18 AM2018-03-26T00:18:16+5:302018-03-26T00:18:16+5:30
भारतात नागरिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढतो आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात रस्त्यांची संख्याही वाढते आहे. त्यामुळे जमिनीत पावसाचे पाणी मुरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रदूषणामुळे आणि वाढत्या तपमानामुळे जलचक्र बिघडले असून, १३0 कोटी लोकसंख्येला पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी सच्छिंद्र शहरे तयार करणे, ही भारताची नजिकच्या काळात गरज बनणार आहे, असे आग्रही प्रतिपादन जलअभ्यासक प्रा. डॉ. सुनील कुटे यांनी केले.
नाशिक : भारतात नागरिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढतो आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात रस्त्यांची संख्याही वाढते आहे. त्यामुळे जमिनीत पावसाचे पाणी मुरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रदूषणामुळे आणि वाढत्या तपमानामुळे जलचक्र बिघडले असून, १३0 कोटी लोकसंख्येला पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी सच्छिंद्र शहरे तयार करणे, ही भारताची नजिकच्या काळात गरज बनणार आहे, असे आग्रही प्रतिपादन जलअभ्यासक प्रा. डॉ. सुनील कुटे यांनी केले. जलजागृती सप्ताह २00८ निमित्त जलसंपदा विभागाच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जलपूजन आणि ग्रंथपूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी अधीक्षक अभियंता व प्रशासक राजेश मोरे, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. कुटे म्हणाले की, आपण भारतीयांनी आपल्याकडील फड बंधाऱ्यांसारखा १६00 वर्षे जुना वारसा जपायला हवा होता. शिवाय स्पंजासिटीसारख्या आधुनिक मार्गांनी भूगर्भातील पाणीस्तर उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत, असेही आवाहन कुटे यांनी करून चीन, अमेरिका, श्रीलंका, फिलिपाईन्स या देशांमधील पाण्याची काटकसर, पाण्याचा पुनर्वापर याविषयी माहिती दिली. व्याख्यानास जलसंपदा विभागाचे अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
जलजागृती कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. रांगोळी स्पर्धा विजेते- शालेय गट- श्रेया सिंगल आणि हिरल मुथा (प्रथम), स्वराली भागवत (द्वितीय). खुला गट- संतोष भागवत (प्रथम), प्रियंका ढोमणे (द्वितीय), तृतीय प्रांजली चंद्रात्रे. चित्रकला स्पर्धा- शालेय गट- सृष्टी नेरकर प्रथम, कोमल धुमणे द्वितीय, स्वयम चिखलीकर तृतीय, यश चांदसरे उत्तेजनार्थ. खुला गट- जयश्री ससाणे (द्वितीय).