रामाची कथा समजावून घेण्याची गरज : आफळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:03 AM2018-03-20T01:03:18+5:302018-03-20T01:03:18+5:30

प्रभू श्रीराम व सावरकरांचा वनवास १४ वर्षांचा होता. राम वनवासात, तर सावरकर तुरुंगात होते. त्यांचा संयम आणि आदरभाव होता, राम व सावरकर यांनी आदराची भावना जोपासली होती म्हणून ते आदर्शवादी ठरले. रामाची कथा व सावरकरांची गाथा समजावून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.

 Need to understand the story of Ram: Afale | रामाची कथा समजावून घेण्याची गरज : आफळे

रामाची कथा समजावून घेण्याची गरज : आफळे

Next

पंचवटी : प्रभू श्रीराम व सावरकरांचा वनवास १४ वर्षांचा होता. राम वनवासात, तर सावरकर तुरुंगात होते. त्यांचा संयम आणि आदरभाव होता, राम व सावरकर यांनी आदराची भावना जोपासली होती म्हणून ते आदर्शवादी ठरले. रामाची कथा व सावरकरांची गाथा समजावून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले. श्री काळाराम संस्थानच्या वतीने वासंतिक नवरात्र महोत्सवात रामायण आणि सावरकरायण या विषयावर आफळे यांनी पहिले पुष्प गुंफले. यावेळी ते म्हणाले वयाच्या पाचव्या ते १५व्या वर्षापर्यंत राम महर्षी वशिष्ठांकडे शिकले. पुढे १५व्या वर्षी शिक्षणासाठी महर्षींकडे गेले व अतिप्रगत ज्ञानप्राप्तीसाठी ते विश्विमत्रांकडे गेले होते म्हणून वशिष्ठांना राग आला नव्हता रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते कारण ते पदाला साजेसे वागले. राम उभा करण्यासाठी सभ्यता, नम्रता असावी लागते, परंतु आज सभ्यता व नम्रता लोप पावत चालली आहे. पराक्रमाबरोबरच प्रभू रामचंद्रांनी गुरुजनांबद्दल आदराची भावना जोपासली हेच सावरकर व राम यांच्यातील साम्य असल्याचे ते म्हणाले. रात्री सांस्कृतिक कार्यक्र मात पराग पांडव यांचा संगीत रामदासायण हा कार्यक्र म संपन्न झाला.

Web Title:  Need to understand the story of Ram: Afale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक