सुरक्षेसाठी ‘वॉटरप्रूफ मास्क’ची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 11:18 PM2020-06-19T23:18:48+5:302020-06-20T00:29:58+5:30

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रशासनाच्या आदेशानुसार घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क बांधण्याची गरज आहे. मात्र, पावसाळ्यामुळे तोंडावर बांधलेले मास्क थोड्याच पावसात ओले होत असल्याने नागरिकांना ओला मास्क घालून ठेवणे अशक्य होऊन जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत आता मास्कदेखील वॉटरप्रुफ किंवा प्लॅस्टिक कोटेड असण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Need a 'waterproof mask' for safety! | सुरक्षेसाठी ‘वॉटरप्रूफ मास्क’ची गरज !

सुरक्षेसाठी ‘वॉटरप्रूफ मास्क’ची गरज !

googlenewsNext
ठळक मुद्देआला पावसाळा : सलग पावसाने नागरिकांना मास्क भिजण्याची समस्या

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रशासनाच्या आदेशानुसार घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क बांधण्याची गरज आहे. मात्र, पावसाळ्यामुळे तोंडावर बांधलेले मास्क थोड्याच पावसात ओले होत असल्याने नागरिकांना ओला मास्क घालून ठेवणे अशक्य होऊन जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत आता मास्कदेखील वॉटरप्रुफ किंवा प्लॅस्टिक कोटेड असण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
शासनाच्या आदेशानुसार बहुतांश नागरिक आता तोंडावर मास्क घालूनच घराबाहेर जातात. तसेच पावसाळा सुरू झाल्याने नागरिक आता घरातून बाहेर पडताना अंगावर रेनकोट किंवा छत्री घेऊनच बाहेर पडतात. त्या परिस्थितीत पाऊस आल्यास घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे अंगावरील कपडे भिजत नाहीत. मात्र, तोंडावरील मास्क भिजून पाण्याने निथळू लागतात. अशा परिस्थितीत ते मास्क तोंडाला कायम ठेवणो, म्हणजे सर्दी पडशाला निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे मास्क काढून टाकण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. त्यामुळे नागरिकांना आता दुहेरी समस्येचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दोन मास्क जवळ बाळगणे किंवा वॉटरप्रुफ मास्कची गरज निर्माण झाली आहे. पांढरा रंगाचे विविध प्रकारचे मास्क, हिरव्या कापडाचे मास्क, डॉक्टर वापरतात ते सर्जिकल मास्क विविध उद्देशाने तयार केले आहेत. या मास्कमुळे विषाणूंना १०० टक्के प्रतिबंध होईलच, अशा प्रकारचा ठोस शास्त्रीय अभ्यास केला
अभिनव प्रकारचे मास्क
विविध प्रकारचे मास्क स्थानिक पातळीवर तयार केले जात आहेत. आपल्या देशात अनेक व्यक्तींनी, संस्थांनी मास्क तयार करण्याचे प्रयत्न केले आहेत, तसेच प्रयत्न परदेशांतही केले गेले आहेत. कॉटनच्या दोन फडक्यांमध्ये एक फिल्टर ठेवून मास्क तयार केला आहे. फोम तयार करण्यासाठी वापरल्या जाणाºया पॉलियुरेथेन या कार्बनी पदार्थाचा वापर करून मास्क तयार करण्यात आले आहेत. हे मास्क चीन, तैवान आणि कोरियात वापरले जात आहेत. त्याचप्रकारे पावसाळ्याच्या दृष्टीने माणसाची गरज आहे.

 

Web Title: Need a 'waterproof mask' for safety!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.