शरीर संपदा निरोगी राहण्यासाठी योगाभ्यासाची नितांत गरज : विश्वास मंडलिक

By admin | Published: February 2, 2015 12:14 AM2015-02-02T00:14:15+5:302015-02-02T00:14:54+5:30

शरीर संपदा निरोगी राहण्यासाठी योगाभ्यासाची नितांत गरज : विश्वास मंडलिक

The need for Yoghavyas to stay healthy for the body property: The belief system | शरीर संपदा निरोगी राहण्यासाठी योगाभ्यासाची नितांत गरज : विश्वास मंडलिक

शरीर संपदा निरोगी राहण्यासाठी योगाभ्यासाची नितांत गरज : विश्वास मंडलिक

Next



त्र्यंबकेश्वर : आजच्या धकाधकीच्या जीवनात व शरीर संपदा निरोगी राहण्यासाठी योगाची अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन योगविद्यापीठाचे प्रमुख योगाचार्य विश्वासराव मंडलिक यांनी केले.
ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलात सन २०१५च्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, योगाने शारीरिक, मानसिक, भावनिक, धार्मिक व आत्मिक विकास होतो. कार्यक्रमाचे उद्घाटन कैलास मठाचे प्रमुख तथा महामंडलेश्वर संविदानंद सरस्वती यांनी केले.
कार्यक्रमास खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमाताई हिरे, आमदार देवयानी फरांदे, मनपा नगरसेवक योगिताताई अहिरे, भगवान खैरनार, माधवराव गायकवाड, विवेकानंद केंद्राचे कंठानंद महाराज आदि मान्यवरांसह सर्व प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी स्वामी संविदानंदजी म्हणाले, त्र्यंबकेश्वर ही संतांची भूमी आहे. येथे ऋषी-मुनींच्या वास्तव्याने ही भूमी व परिसर पुनित झाला आहे. येथील पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व उपस्थितांना विशद केला. संस्थेच्या कार्याचा गौरव करून पानगव्हाणे यांचाही गौरव केला. संस्थेच्या प्रगतीची माहिती देताना राजाराम पानगव्हाणे म्हणाले, शिक्षण घेऊनही आजकाल नोकऱ्यांची दारे बंद झाली आहेत. व्यावसायिक शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी आगामी जीवनात स्वत:चे व्यवसाय, उद्योग सुरू करावेत, असे आवाहन केले. आमदार हिरे व आमदार फरांदे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर अध्यक्षपदावरून बोलताना खासदार चव्हाण यांनी आपल्या ३६ वर्षांच्या राजकीय जीवनाचे चढउतार सांगितले. यावेळी त्यांनी तरुणाईला कार्यक्रमाची ओढ असल्याने भाषणबाजीला आपण थोडक्यात आटोपतो. तरीही संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या असल्याने याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शिक्षण घेऊन यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या प्रगतीचे वाचन इंजिनिअंिरंग कॉलेजचे प्राचार्य चंद्रशेखर पाटील यांनी केले तर प्राचार्य सुनील बच्छाव यांनी आभार मानले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांचेदर्शन म्हणून कार्यक्रम सुरू करण्यात आला.

Web Title: The need for Yoghavyas to stay healthy for the body property: The belief system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.