रस्त्यातील झाडे तोडण्यापेक्षा पुनर्रोपणाची गरज : अश्विनी भट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:14 PM2019-12-28T23:14:04+5:302019-12-28T23:44:39+5:30
नाशिक : शहरात रस्त्यात झाडे येत असल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याचे निमित्त करून महापालिकेने ८१ झाडांवर कु-हाड चालविण्याची तयारी केली आहे. मात्र, झाडे तोडण्यापेक्षा त्याचे पुनर्रोपण केले पाहिजे असे मत नाशिक कृती समितीच्या कार्यकर्त्या आणि पर्यावरणप्रेमी अश्विनी भट यांनी व्यक्त केले.
नाशिक: शहरात रस्त्यात झाडे येत असल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याचे निमित्त करून महापालिकेने ८१ झाडांवर कु-हाड चालविण्याची तयारी केली आहे. मात्र, झाडे तोडण्यापेक्षा त्याचे पुनर्रोपण केले पाहिजे असे मत नाशिक कृती समितीच्या कार्यकर्त्या आणि पर्यावरणप्रेमी अश्विनी भट यांनी व्यक्त केले. नाशिकमधील झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्या भट यांनी यापूर्वीदेखील मुंबई- आग्रा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या वेळी वृक्षतोडीस विरोध करण्यासाठी न्यायालयीन लढा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद
प्रश्न : शहरातील वृक्षतोडीला तुमचा विरोध का?
भट : महापालिकेचे काम मुळातच हा पर्यावरण संवर्धनाचे असले पाहिजे. नाशिकचा समावेश प्रदूषणकारी शहरांच्या यादीत झाला आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे पर्यावरण राखले पाहिजे. रस्त्याच्या कडेला दर दहा मीटर अंतरावर स्थानिक प्रजातीची झाडे लावली पाहिजेत, असा नियम आहे. परंतु, तसे होत नाही. महापालिकेच्या वतीने झाडे तोडण्यात जेवढे स्वारस्य दाखविले जातो तेवढे झाडे तोडण्यात स्वारस्य दाखविले जात नाही. किमान झाडे तोडायची तर शास्त्रोक्त पद्धतीने काढून त्यांचे पुनर्रोपण केले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. धुळ्यात २१ जूनी झाडे पुनर्रोपणानंतर टिकली आहेत, मात्र नाशिकमध्येच ती का टिकत नाही याचा शोध घेतला पाहिजे.
प्रश्न : महापालिकेच्या वतीनेदेखील वृक्षलागवड केली जाते, गेल्या वर्षी तर देवराई उपक्रम राबविण्यात येत आहे, त्याविषयी काय सांगाल?
भट : महापालिकेने गेल्या वर्षभरात चांगले वृक्षारोपण केले आहे. ब्लॉक प्लॅँटेशनदेखील केले आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, अशाप्रकारची झाडे लावणे बंधनकारकच आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला असलेली जुनी पन्नास - शंभर वर्षांपूर्वीची झाडे तोडायची आणि त्या बदल्यात ब्लॉक प्लॅँटेशन करायचे याला कोणताही अर्थ नाही. रस्त्याच्या कडेलादेखील झाडे लावणे बंधनकारक असून, तेथे झाडे लावणे बंधनकारच आहे.
प्रश्न : रस्त्यातील झाडे तोडण्यात गैर काय?
भट : महापालिका रस्त्याच्या कडेला झाडे लावतच नसल्याचे लक्षात आल्याने यापूर्वीच न्यायालयाने देशी प्रजातीची झाडे हटवू नये, असे आदेश दिला आहे. मात्र, त्यानंतरदेखील रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण होत नाही. रस्त्यालगतही रुंदीकरण करून डांबरीकरण करताना बुंधे मोकळे ठेवले जात नाही. त्यामुळे झाडे फार काळ टिकत नाही. रस्त्यातील झाडांमुळे अपघात होतात, त्यामुळे ती तोडावा अशी एक मागणी आहे. परंतु नीट तपास केला तर झाडांमुळे अपघातात बळी पडणाऱ्यांपेक्षा रस्ता अपघातात बळी जाणाºया पादचाºयांची संख्या अधिक आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू होतो त्यांचे दु:ख मी समजू शकते. परंतु रस्त्यात येणाºया झाडावर फ्लोरोसंट कलरने पेंट करण्याचे साधे सौजन्य महापालिका दाखवत नाही, केवळ खिळ्याने रिफ्लेक्टर ठोकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे झाडांवर मोटर आदळून होणाºया अपघातांमध्ये झाडे नव्हे तर महापालिकेचा गलथान कारभार कारणीभूत आहे.
मुलाखत-संजय पाठक