निमाणी बसस्थानकाकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:23 IST2019-11-21T00:22:32+5:302019-11-21T00:23:03+5:30
पावसाळ्यात निमाणी बसस्थानकात पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने खड्ड्यांचे चित्र आजही ‘जैसे थे’ आहे.

निमाणी बसस्थानकाकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष
पंचवटी : पावसाळ्यात निमाणी बसस्थानकात पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने खड्ड्यांचे चित्र आजही ‘जैसे थे’ आहे. निमाणी बसस्थानकातील खड्डे आणि रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे प्रवाशांची गैरसोय तर होतेच शिवाय एसटी बसेसचे नुकसान होत असल्याने एसटी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन खड्डे बुजवावे, अशी मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.
बसस्थानकातील रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी करून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडते.
पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरपासून बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. खड्ड्यांमुळे बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना तसेच बसचालकांना खडतर मार्गाचा त्रास सहन करावा लागत आहे. बसचालकांना बसस्थानकात बस नेताना तसेच बाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागते. एसटी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने निमाणी बसस्थानकातील रस्त्यावरची खडी उखडली आहे.