ओेझरखेडचे आवर्तन सोडण्याची निफाड, चांदवडकरांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:25 PM2018-10-25T23:25:24+5:302018-10-25T23:26:13+5:30

लासलगाव : ओझरखेड कालव्याचे पाणी जायकवाडीला सोडू नये, ओझरखेड कालव्याचे आवर्तन तातडीने सोडावे आणि निफाड व येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, खडकमाळेगावचे सरपंच दत्त रायते, कोटमगावचे सरपंच तुकाराम गांगुर्डे, शिरवाडेचे सरपंच शरद काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे दिले.

Neepad, Chandwadkar's demand to leave the cycle of ozarkkhed | ओेझरखेडचे आवर्तन सोडण्याची निफाड, चांदवडकरांची मागणी

सटाणा शहरातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याशी चर्चा करताना आमदार डॉ. राहुल अहेर. सोबत नगराध्यक्ष सुनील मोरे.

Next
ठळक मुद्देशासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल.

लासलगाव : ओझरखेड कालव्याचे पाणी जायकवाडीला सोडू नये, ओझरखेड कालव्याचे आवर्तन तातडीने सोडावे आणि निफाड व येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, खडकमाळेगावचे सरपंच दत्त रायते, कोटमगावचे सरपंच तुकाराम गांगुर्डे, शिरवाडेचे सरपंच शरद काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे दिले.
ओझरखेड कालव्याअंतर्गत येणाºया गावांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थिती आहे. यावर्षीही समाधानकारक पाऊस न झाल्याने परिसरात शेतकरीवर्गापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. निफाड तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात आजही भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ओझरखेड कालव्याच्या लाभ क्षेत्रामध्ये ७०हून अधिक पाणीवाटप सहकारी संस्था आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकºयांनी या कालव्याच्या भरोशावर द्राक्षबागेसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले असून, आपल्या द्राक्षबागा उभ्या केल्या आहेत.
ओझरखेड कालव्यातून चांदवड तालुक्यासाठी ३६ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या सर्व भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता ओझरखेड धरणातून जायकवाडीत पाणीपुरवठा केल्यास या भागात भीषण पाणीटंचाई जाणवू शकते. यासाठीचे निवेदन पालकमंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले. यावेळी शरद काळे, माधवराव ढोमसे, रावसाहेब रायते, मोतीराम रायते, विठ्ठल कहाने, सारोळे, सरपंच कैलास भोसले, वनसगाव सरपंच उमेश डुंबरे, योगेश रायते, रामनाथ शिंदे, नंदू काळे, शंकर शिंदे, दत्ता मापारी, नंदू खुर्द, दादासाहेब खराटे तसेच विविध गावांतील पाणीवापर संस्थांचे चेअरमन उपस्थित होते.सटाणा, देवळा शहरासाठी पहिले आवर्तन १० नोव्हेंबरलासटाणा : शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या
१० नोव्हेंबरपर्यंत चणकापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा नदीपात्रात पहिले आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली आहे. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याचे भीषण संकट उभे ठाकले आहे. बागलाण तालुक्यातील केळझर मध्यम प्रकल्प व कळवण तालुक्यातील चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात सोडले जाणारे पाण्याचे आवर्तन जिल्हा प्रशासनाने थांबविले आहे. सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाºया गिरणा व आरम नदीपात्रातील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
सध्या शहरात दहा दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांना भटकंती करावी लागत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरु वातीलाच दिवाळीचा सण येत असून नागरिकांना या सणासाठी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे १० नोव्हेंबर ऐवजी १ नोव्हेंबरला पाण्याचे आवर्तन सोडावे, या आग्रही मागणीसाठी आमदार डॉ. राहुल अहेर, सटाणा पालिकेचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता उन्हाळ्यात सटाणा शहरासाठी शंभर दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी चणकापूर धरणातून आवर्तनाने सोडणार असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी या भेटीत सांगितले. यावेळी महाराणा प्रताप क्र ांतिदलाचे जिल्हाध्यक्ष नाना मोरकर, हेमंत भदाणे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.निफाड आणि येवला तालुक्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे ओझरखेड कालव्यातील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यास आमचा विरोध आहे. शासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल.
- शिवा सुरासे, पंचायत समिती सदस्य.

Web Title: Neepad, Chandwadkar's demand to leave the cycle of ozarkkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण