निगेटिव्ह रक्तगटातील संबंधातून पुढील पिढीत विकलांगता शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:16 AM2021-08-29T04:16:26+5:302021-08-29T04:16:26+5:30

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत आयोजित ‘गुणसूत्रांची रचना व कार्य’ या विषयावर विशेष ...

Negative blood group relationships make disability possible in the next generation | निगेटिव्ह रक्तगटातील संबंधातून पुढील पिढीत विकलांगता शक्य

निगेटिव्ह रक्तगटातील संबंधातून पुढील पिढीत विकलांगता शक्य

googlenewsNext

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत आयोजित ‘गुणसूत्रांची रचना व कार्य’ या विषयावर विशेष व्याख्यान प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विभांडिक बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते. विशेष अतिथी म्हणून प्रा. डॉ. पुरुषोत्तम पाटील उपस्थित होते. पहिल्याने एकपेशीय सजीव निर्माण झाला व पुढे बहुपेशीय सजीव सृष्टी निर्माण झाली. पेशी या अतिशय सूक्ष्म आहेत. डोळ्यांनी त्या दिसत नसल्या तरी त्यांचे अस्तित्व आहे. या पेशींमध्ये गुणसूत्रे आहेत. माणसात आईकडून आलेले २३ व वडिलांकडून आलेले २३ असे ४६ गुणसूत्रे आहेत. त्यात ४६ हजार डीएनए आहेत. शरीर आणि मनाच्या रचनेत या गुणसूत्रांचे महत्त्व आहे. आई आणि वडील यांच्या गुणसूत्रात जो प्रभावी असेल त्यानुसार व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडते. शरीरातील जीन्स आवश्यकतेनुसार कार्य करत असतात. ४६ क्रोमोझोन्समध्ये वाढ किंवा कमतरता झाली, क्रोमोझोन्सची लांबी कमी - जास्त झाली तरी सिंड्रोम निर्माण होऊन व्यक्ती अबनॉर्मल होते, असे डॉ. अजय विभांडिक यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक प्रबोधिनीचे समन्वयक प्रा. बापू शेलार यांनी केले. प्रास्ताविक डॉ. मनीषा गायकवाड यांनी केले. अतिथी परिचय प्रा. टी. एस. सांगळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी केले तर आभार प्रा. डी. के. कन्नोर यांनी मानले.

फोटो- २७ डॉ. विभांडिक

येवला महाविद्यालयात आयोजित व्याख्यानप्रसंगी बोलताना डॉ. अजय विभांडिक. मंचावर प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, प्रा. बी. एल. शेलार, प्रा. डॉ. धनराज धनगर आदी.

270821\442227nsk_28_27082021_13.jpg

 फोटो- २७ डॉ. विभांडीक 

Web Title: Negative blood group relationships make disability possible in the next generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.