कोरोना चाचण्यांच्या निगेटिव्ह प्रमाणात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 10:50 PM2020-10-05T22:50:42+5:302020-10-06T01:13:22+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत असली तरी प्रत्यक्षात कोरोनाच्या चाचण्यांमध्ये रुग्ण बाधित असण्याचे अर्थात अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. म्हणजेच एकूण कोरोना चाचण्यांमध्ये रुग्णचा अहवाल निगेटिव येण्याच्या प्रमाणात झालेली वाढ काहीशी दिलासादायक आहे.
नाशिक : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत असली तरी प्रत्यक्षात कोरोनाच्या चाचण्यांमध्ये रुग्ण बाधित असण्याचे अर्थात अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. म्हणजेच एकूण कोरोना चाचण्यांमध्ये रुग्णचा अहवाल निगेटिव येण्याच्या प्रमाणात झालेली वाढ काहीशी दिलासादायक आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या 2 लाख 81 हजारहून अधिक चाचण्यांमधून 2 लाख 49 नागरिक निगेटिव्ह आले असल्यामुळे एकुणातच अहवाल निगेटिव्ह येण्याची संख्या गत महिनाभरात वाढली आहे. ज्यांना थोडीफार देखील तापाची कणकण किंवा सर्दी-खोकला होतो, असे नागरिक स्वयंस्फूर्तीने तपासणी करून घेत असल्याने त्यातील बहुतांश जण हे नियमित ताप किंवा सर्दी खोकल्याचे रुग्ण असल्याचे आढळते. त्यामुळे त्यांच्यात कोणत्याही प्रकारची कोरोनाची बाधा असल्याचे आढळून येत नाही. त्यामुळेच हे निगेटिव्ह चाचण्यांचे प्रमाण वाढते असल्याचे निदशर्नास येत आहे. वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार आणि लक्षणे दिसत असल्याने नागरिकांच्या मनात शंका येणे सहाजिक आहे. त्यामुळे अशा नागरिकांचे तपासणी करण्याचे प्रमाण काहीअंशी वाढले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने अत्यंत खात्रीशीर असणा?्या आरटीपीसीआर टेस्टच्या प्रमाणात देखील वाढ करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत घरोघरी जाऊन जनजागृती आणि चाचण्यांच्या मोहिमेला वेग देण्यात आला आहे. त्यामुळे वेळीच बाधितांचा शोध घेणे देखील शक्य झाले असून त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. सहा महिन्यांपासून सर्व आरोग्य यंत्रणा आणि कमर्चारी अथकपणे करणाच्या विरोधातील लढाई लढत असलेले तरीदेखील रुग्ण आढळण्याचे प्रमाण फारशी घट आलेली नाही. त्यामुळे अजून काही काळ तरी ही लढाई सुरूच राहणार आहे. नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल 69 हजार 171 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात एकूण नऊ हजार 508 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या 1437 झाली असून नवीन दाखल होणा?्या रुग्णांचे प्रमाण देखील सातत्याने दीड हजार च्या वरच राहिले आहे . आरटीपीसीआर चाचणी आणि त्यांच्या अहवालाला वेग देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या काहीशी कमी झाल्याचे दिसत आहे. तरी अद्यापही हा आकडा 1000 पेक्षा अधिक असून हा आकडा देखील कमी होण्याची आवश्यकता आहे.