‘अभिनव भारत’च्या स्मारकाची राज्य सरकारकडूनही उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:51 AM2019-05-28T00:51:38+5:302019-05-28T00:52:05+5:30

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संस्थेच्या वाड्याचे नूतनीकरण करून आधुनिक स्मारक साकारण्यासाठी यापूर्वी केवळ घोषणाच झाली असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यटन मंत्रालयाला आराखडा सादर केला आहे.

 Neglect of 'Abhinav Bharat' memorial of state government | ‘अभिनव भारत’च्या स्मारकाची राज्य सरकारकडूनही उपेक्षा

‘अभिनव भारत’च्या स्मारकाची राज्य सरकारकडूनही उपेक्षा

googlenewsNext

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संस्थेच्या वाड्याचे नूतनीकरण करून आधुनिक स्मारक साकारण्यासाठी यापूर्वी केवळ घोषणाच झाली असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यटन मंत्रालयाला आराखडा सादर केला आहे. मात्र, पर्यटन मंत्रालयाने निधीच न दिल्याने हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. राज्य सरकारचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून, आता तरी याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा सावरकरप्रेमी स्वत:च या कामी पुढाकार घेण्याच्या तयारीत आहेत.
नाशिकचे भूमिपुत्र असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्ययन करत असतानाच मित्र मेळा ही संस्था स्थापन केली, पुढे तिचे नाव बदलून अभिनव भारत या संघटनेची स्थापना १९०४ मध्ये केली. नाशिकमधील तीळभांडेश्वरमध्ये त्याचे कार्यालय होते. ब्रिटिशांच्या विरोधात लढणारे अनेक क्रांतिकारी या संघटनेशी जोडलेले होते. देशभरात या संघटनेच्या अनेक शाखा त्याकाळी उघडल्या गेल्या आणि सावरकर लंडनमध्ये गेल्यानंतर तेथेदेखील अभिनव भारतचा प्रसार झाला. १९५२ मध्ये म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सावरकर यांनी स्वत:च या संघटनेचे कार्य आता संपल्याचे सांगून ती संघटना विसर्जित केली. नाशिकमध्ये असलेल्या संघटनेच्या कार्यालयाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे त्याच्या नूतनीकरणाची गरज असतानाच पर्यटन खात्याच्या माध्यमातून अद्ययावत स्मारक करण्याचे ठरविण्यात आले. आमदार देवयानी फरांदे यांनी याकामी पुढाकार घेतला. परंतु आता सरकारची पाच वर्षे संपत आली तरी स्मारकासाठी निधीच उपलब्ध करून दिलेला नाही. विशेष म्हणजे अन्य अनेक धार्मिक संस्था, क्रीडा संस्थांना पर्यटन महामंडळाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर त्याचे कामही सुरू झाले आहे. सावरकर यांना मानणाऱ्या विचारांचे सरकार असूनही जर त्याचा विकास होत नसेल तर तसे स्पष्ट झाले पाहिजे, म्हणजे आता सावरकरप्रेमीच हे काम हाती घेतील, अशा प्रतिक्रिया सावरकरप्रेमींनी व्यक्त केल्या.

Web Title:  Neglect of 'Abhinav Bharat' memorial of state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.