महापालिकेच्या अनास्थेमुळे कलाकारांची होतेय उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:54 AM2019-01-29T00:54:03+5:302019-01-29T00:54:24+5:30

शहरात मोठ्या प्रमाणात कलारसिक आहेत. अनेक विद्यार्थ्यांसह विविध शैक्षणिक संस्था आणि पालकांनी आपल्या कुटुंबासह महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाच्या विद्यार्थी विभागातर्फे २३ ते २८ जानेवारीदरम्यान आयोजित ५९व्या कलाप्रदर्शनाला भेट देत विविध कलाकृतींना दाद दिली.

 The neglect of the artist due to the disruption of the corporation | महापालिकेच्या अनास्थेमुळे कलाकारांची होतेय उपेक्षा

महापालिकेच्या अनास्थेमुळे कलाकारांची होतेय उपेक्षा

Next

नाशिक : शहरात मोठ्या प्रमाणात कलारसिक आहेत. अनेक विद्यार्थ्यांसह विविध शैक्षणिक संस्था आणि पालकांनी आपल्या कुटुंबासह महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाच्या विद्यार्थी विभागातर्फे २३ ते २८ जानेवारीदरम्यान आयोजित ५९व्या कलाप्रदर्शनाला भेट देत विविध कलाकृतींना दाद दिली. परंतु, येथील महानगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे कलाकारांची उपेक्षा होत असल्याची खंत प्रदर्शनाच्या आयोजकांनी व्यक्त केली आहे.
कलाक्षेत्रासमोर सर्वांत मोठे आव्हान आर्थिक स्वरूपाचे असते. त्यामुळे कलाकारांना त्यांच्या कलाकृती सादर करण्यासाठी माफक दरात कलादालन उपलब्ध होणे अपेक्षित असते. परंतु नाशिक महानगरपालिकेकडून महाक वी कालिदास कलामंदिरप्रमाणेच महात्मा फु ले कलादालनासाठी अवाढव्य भाडे आकारले जात असल्याने कलाकारांना येथे कलाप्रदर्शन भरविणे परवडणारे नाही. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेने महाकवी कालिदास कलामंदिरसोबतच महात्मा फुले कलादालनाचेही अद्यावतीकरण केले. परंतु, या कामात कला क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला गेला नसल्याने दालनात प्रकाश योजना, रंगसंगती आणि सादरीकरणासाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये अनेक तांत्रिक उणिवा राहिल्या असल्याचे सहायक प्रदर्शन अधिकारी राहुल थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नाशिक शहरात राज्यस्तरीय प्रदर्शन सुरू असताना महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रदर्शनाला भेट दिली. परंतु, येथील लोकप्रतिनिधींनी अथवा महानगरपालिकेच्या कला व सांस्कृतिक तसेच शिक्षण विभागाच्या कोणत्याही अधिकाºयांना या प्रदर्शनाची साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही हे खेदजनक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
सुविधांचा अभाव
कलादालनात प्रकाशयोजना, रंगसंगतीचा अभाव असून, सादरीकरणासाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये अनेक तांत्रिक उणिवा आहेत. येथे येणाºया कलाकारांच्या निवासाची व्यवस्था नाही. शिवाय कलादालनाचे स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने कलारसिकांची गैरसोय होते. दालनात योग्य प्रकाश योजना आणि उपहारगृहाची सोय नसल्याने येथे येणारा कलारसिक अधिकवेळ थांबत नाही. शहरातील अनेकजण सायंक ाळी उशिरा बाहेर पडतात. परंतु योग्य प्रकाश योजनेअभावी प्रदर्शन सायंकाळी ७ वाजताच बंद करावे लागत असल्याने अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आयोजकांनी शेवटचे दोन दिवस आहे त्याच परिस्थिती प्रदर्शन सायंकाळी ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. संचालनालयाने आवश्यक साहित्याची जुळवाजुळव केली, परंतु सामान्य कलाकारांसाठी असे करणे अतिशय कठीण असल्याचेही प्रदर्शन अधिकाºयांनी सांगितले.
सहा दिवसांच्या ५९व्या कलाप्रदर्शनात सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत जवळपास दहा हजार कलारसिकांनी महात्मा फुले कलादालनातील प्रदर्शनाला भेट दिली. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रविवारपासून प्रदर्शनाची वेळ वाढवून सायंकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रदर्शनाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे आयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महात्मा फुले कलादालन येथे विविध प्रदर्शने होतात, परंतु येथे कला सादरीकरणाच्या सुविधांचाच अभाव आहे. कलादालन केवळ स्मार्ट म्हणून होत नाही, तर तेथील सुविधांनी ते स्मार्ट होते. येथे कलारसिकांच्या सुविधांचाही विचार केलेला नाही. त्याचप्रमाणे कलाकाराच्याही सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष झालेले दिसते, असे असतानाही महापालिकेकडून अवाढव्य भाडे आकरले जाते. कला संचालनालयाला या सहा दिवसांच्या प्रदर्शनासाठी तब्बल १ लाख २० हजार रुपये मोजावे लागले. त्यामुळे येथे प्रदर्शन भरविणे सामान्य कलाकारांना परवडणारे नाही.  - राहुल थोरात, सहायक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन

Web Title:  The neglect of the artist due to the disruption of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.