हा राज्य सरकारचा निष्काळजीपणा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:15 AM2021-04-22T04:15:46+5:302021-04-22T04:15:46+5:30
नाशिक शहरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाला भेट दिल्यानंतर दरेकर बाेलत होते. नाशिकमधील घटना दुर्दैवी आहे. मात्र, ऑक्सिजन टाकीच्या ठिकाणी ...
नाशिक शहरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाला भेट दिल्यानंतर दरेकर बाेलत होते. नाशिकमधील घटना दुर्दैवी आहे. मात्र, ऑक्सिजन टाकीच्या ठिकाणी काय व्यवस्था होती. कुशल तंत्रज्ञ उपलब्ध होते काय, नसेल तर का नव्हते, असा प्रश्न उपस्थित करीत दरेकर म्हणाले की, ऑक्सिजन गळती ४० ते ४५ मिनिटात आटोक्यात आली असली तरी कुशल तंत्रज्ञ याठिकाणी असते तर कदाचित हीच गळती अवघ्या पंधरा वीस मिनिटांत आटोक्यात आली असती.
राज्य सरकारने आता तरी जागे होण्याची गरज आहे. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन्सची टंचाई आहे. मध्यंतरी विक्रमगढ येथे अशाच प्रकारे वेळेत ऑक्सिजन पोहोचला नसता तर ६३ जणांना जीव गमावावा लागला असता. ठाणे, मीरा भाईंदर, नालासोपारा अशा अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्ण स्थलांतरित करावे लागले होते.
त्यामुळे राज्य सरकारने व्यवस्था बळकट करावी, असे वारंवार आम्ही सांगत आहोत. केंद्र सरकारने दीड हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार विमानाने हा ऑक्सिजन मागवावा म्हणजे वेळ वाचू शकेल, असेही दरेकर म्हणाले.