ना कर्जमाफीचा लाभ ,ना निसर्गाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 12:02 AM2021-06-24T00:02:24+5:302021-06-24T00:02:50+5:30

जळगाव नेऊर : मोठा गाजावाजा करून हवामान खात्याने चांगल्या पावसाचे संकेत दिल्याने शेतकरी सुखावला होता. याबरोबरच मृग नक्षत्रात झालेल्या ...

Neither the benefit of debt forgiveness, nor the support of nature | ना कर्जमाफीचा लाभ ,ना निसर्गाची साथ

ना कर्जमाफीचा लाभ ,ना निसर्गाची साथ

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची व्यथा : दुबार पेरणीचे संकट

जळगाव नेऊर : मोठा गाजावाजा करून हवामान खात्याने चांगल्या पावसाचे संकेत दिल्याने शेतकरी सुखावला होता. याबरोबरच मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील शेतकऱ्यांनी उधार, उसनवारीवर बियाणे, खते खरेदी करून शेतीआड केले. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने पाठ फिरविल्याने दुबार पेरणीचे अरिष्ट शेतकऱ्यांवर कोसळले आहे.

दोन दोन किलोमीटरवर पावसाने लपवाछपवीचा खेळ खेळल्याने काही शेतकऱ्यांचे बियाणे उतरले तर काहींचे उतरलेच नाही. पश्चिम भागात अजूनही शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या नसल्याने बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे, तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकताच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून तीन लाखापर्यंत अल्प मुदत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदर असणार आहे. मात्र दोन लाखाच्या वरील कर्ज असलेल्या व दरवर्षी वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजारापर्यंतच्या सानुग्रह अनुदानापासून शेतकरी वंचितच आहे.

शासनाच्या प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार व दोन लाखाच्या वरील रक्कम भरल्यानंतर मिळणाऱ्या दोन लाख रकमेपासून शेतकरी अद्यापही वंचित आहे. शासनाने लवकरात लवकर दोन लाखाच्यावरील रक्कमेवरील कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदान द्यावे.
- मच्छिंद्र ठोंबरे, शेतकरी, पुरणगाव.


येवला तालुक्‍यात उत्तर पूर्व भागातील पावसाच्या प्रतीक्षेत असलेले पीक.

Web Title: Neither the benefit of debt forgiveness, nor the support of nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.