नेमिनाथ जैन संस्थेकडून गुणवत्तेबरोबरच संस्कारांची जोपासना - राजेंद्र दर्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 04:52 PM2019-01-06T16:52:32+5:302019-01-06T16:55:26+5:30

चांदवड  येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या विविध विद्याशाखांतील नूतन इमारती तसेच दानशूरांनी दिलेल्या देणगीतून साकारलेल्या प्रवेशद्वारांचे लोकार्पण आज णमोकार मंत्राच्या जयघोषात प्रचंड उत्साहात विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राज्याचे माजी शिक्षण व उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांनी नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम ही संस्था गुणवत्तेबरोबरच संस्कार जपण्याचे काम करीत असल्याचे गौरवोद्गार काढले.

Neminath Jain's organization to promote values for values as well - Rajendra Darda | नेमिनाथ जैन संस्थेकडून गुणवत्तेबरोबरच संस्कारांची जोपासना - राजेंद्र दर्डा

नेमिनाथ जैन संस्थेकडून गुणवत्तेबरोबरच संस्कारांची जोपासना - राजेंद्र दर्डा

googlenewsNext

सोहळ्यास आमदार सुभाष झांबड, आमदार प्रशांत बंब, जळगावच्या जैन एरिगेशनचे अशोक जैन, दलूभाऊ जैन, जैन श्वेतांबर कॉन्फरन्सचे अध्यक्ष मोहनलाल चोपडा, विजयकुमार लोढा, सी. बी. छाजेड, जयपूरचे लाभचंद कोठारी आणि चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक करून ९० वर्षांपूर्वी चार विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेल्या या संस्थेचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे सांगितले. केजी टू पीजी अशी मोठी वाटचाल करताना संचालकांनी घेतलेले परिश्रम व देणगीदारांनी दाखविलेल्या दातृत्वाचे कौतुकही दर्डा यांनी यावेळी केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ९१ वर्षीय संपतलाल सुराणा यांचा गौरव करण्यात आला. तसेच बेबीलाल संचेती यांचा ४० वर्षे संस्थेचे प्रबंध समितीच्या अध्यक्षपदी यशस्वीरीत्या कामकाज केल्याबद्दल गौरव करण्यात आला. मुंबईचे पारसमल बुधमल जैन (मोदी) यांची आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, दिल्लीच्या राष्टÑीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने पाहुण्यांच्या हस्ते त्यांचाही गौरव करण्यात आला. संस्थेच्या प्रांगणात नेमिनगर येथे झालेल्या या समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या विश्वस्तांसह दात्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी स्व. बन्सीलाल संचेती (वैजापूर) प्रवेशद्वाराचे उद्घाटन जीवन संचेती यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीमान केशरचंद बोरा (पुणे) प्रवेशद्वाराचे उद्घाटन राजेंद्र बोरा यांच्या हस्ते, सौ. सविता फिरोदिया (अहमदनगर) प्रवेशद्वाराचे उद्घाटन कांतिलाल जैन यांच्या हस्ते, स्व. मोहनलाल साखला इंजिनिअरिंग कॉलेज आॅडिटोरियमचे उद्घाटन रमेश फिरोदिया यांच्या हस्ते, श्रीमती कमलाबाई खिंवसरा (मुंबई) आॅपरेशन थिएटरचे उद्घाटन कमलाबाई खिंवसरा यांच्या हस्ते, स्व. सचिन संचेती (वैजापूर) आरएमडी होस्टेल अ‍ॅम्पिथिएटरचे उद्घाटन लीलाबाई संचेती यांच्या हस्ते, स्व. धनराज भन्साळी (कोपरगाव) इंजिनिअरिंग कॉलेज कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन अरविंद भन्साळी यांच्या हस्ते, कला, वाणिज्य व विज्ञान ज्युनिअर कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि मदनबाई पारसमल पारख (नांदगाव) अभ्यासिकेचे उद्घाटन हुकूमचंद पारख यांच्या हस्ते, सोलर सिस्टीमचे उद्घाटन जळगावच्या जैन उद्योगसमूहाचे अशोक जैन यांच्या हस्ते, स्व. आसारामजी जवाहरलाल चोरडिया (मालेगाव) इंजिनिअरिंग कॉलेज अ‍ॅम्पिथिएटरचे उद्घाटन सुभाष चोरडिया आणि स्व. कमलाबाई माणिकचंद शिंगी (कोपरगाव) इंजिनिअरिंग कॉलेज प्रशासन विभागाचे उद्घाटन रवींद्र माणिकचंद शिंगी यांच्या हस्ते करण्यात आले. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रमच्या विश्वस्त मंडळाने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. याचवेळी जीवन संचेती (वैजापूर), राजेंद्र बोरा (पुणे), रमेश फिरोदिया (अहमदनगर) मदनलाल, पारसमल, अशोक, ललित, गौतम साखला परिवार (नाशिक), अनिल खिंवसरा (मुंबई), शोभाचंद संचेती (वैजापूर), हुकूमचंद पारख (नांदगाव), अरविंद भन्साळी (कोपरगाव), रवींद्र शिंगी (कोपरगाव), सुभाष चोरडिया (मालेगाव) या देणगीदारांचाही सत्कार करण्यात करण्यात आला. यावेळी प्रबंध समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती यांनी प्रास्तविक करताना संस्थेच्या आजवरच्या कामकाजाचा आढावा घेतला. १३ हजार विद्यार्थीसंख्या असलेल्या या संस्थेला प्रामाणिक व गुणवत्तेने काम करणारा शिक्षक व कर्मचारी वर्ग लाभल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. याप्रसंगी जवाहरलाल आबड, दलिचंद चोरडिया, कांतीलाल जैन, अजित सुराणा, अरविंद भन्साळी, अशोक जैन, कांतीलाल बाफना, दिनेशकुमार लोढा, रविंद्र संचेती, नंदकिशोर ब्रम्हेचा, झुंबरलाल भंडारी, शांतिलाल अलिझाड, सुमतीलाल सुराणा, सुनील चोपडा, डॉ.सुनील बागरेचा, राजकुमार बंब, नाशिक मर्चंट को-आॅप-बॅँकेचे चेअरमन सोहनलाल भंडारी, उद्योगपती अशोक कटारिया, के.आर. बेदमुथा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

Web Title: Neminath Jain's organization to promote values for values as well - Rajendra Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.