नेपाळसह दुबईतही समर्थ सेवा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:46 AM2018-05-18T00:46:48+5:302018-05-18T00:46:48+5:30
नाशिक : महाराष्ट्र आणि प्रमुख राज्यांमध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे काम सुरू असून, आता भारताबाहेरही सेवामार्गाच्या कार्याची मागणी होऊ लागल्याने गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन मोरे यांच्या पुढाकाराने दुबई आणि नेपाळ देशांमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तसेच विविध शाळांमध्ये बालसंस्कार वर्गांचा शुभारंभ करण्यात आला.

देश-विदेश अभियानाच्या वतीने नितीन मोरे व त्यांचे सेवेकरी यासाठी परिश्रम घेत आहेत, अमेरिका, इंग्लड, नेदरलँड, जर्मनी, सिंगापूर, बेल्जियम, नेपाळ, आॅस्ट्रेलिया आणि दुबई देशातील महानगरांमध्ये सेवामार्गाच्या वतीने उपक्रम राबविले जात आहेत.
नेपाळ देशात गेलेल्या मोरे यांच्यासह सेवेकऱ्यांचे नेपाळच्या राजकन्या सीतासमा राज्यलक्ष्मी देवी शाह यांनी काठमांडूत स्वागत केले. नेपाळमध्ये झालेल्या उपक्र मांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाºयांनीही हजेरी लावली. दुबई केंद्रातर्फे आॅक्टोबर म्ािहन्यात श्री स्वामी समर्थ महोत्सव दुबई २०१८चे आयोजन करण्यात आले आहे. यातदेखील सेवा मार्गाच्या विविध विभागांचे सादरीकरण करून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येईल.
केंद्रांच्या शुभारंभासह श्री गणेश याग, श्री स्वामी याग, शक्तिपीठ श्री गुह्णेश्वरी येथे चण्डियाग, बालसंस्कार कार्य करणाºया सेवेकºयांचे प्रशिक्षण, शाळांमध्ये बालसंस्कार वर्र्गांचा शुभारंभ, वास्तुशास्त्र, आयुर्वेद आरोग्य मार्गदर्शन व रु ग्ण तपासणी, गर्भ संस्कार व सुजाण पालकत्व, रु द्र याग, कृषी व गोवंश यावर मार्गदर्शन करण्यात येईल.