नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याचे बुडालेले साडेसहा लाख मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:17 AM2021-02-25T04:17:44+5:302021-02-25T04:17:44+5:30

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नेपाळ येथील व्यापारी राजाराम मुक्तीनाथ रेग्मी यांना चांदवड येथील कांदा व्यापारी संशयित राहुल चौधरी ...

Nepal's onion trader got Rs 6.5 lakh drowned | नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याचे बुडालेले साडेसहा लाख मिळाले

नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याचे बुडालेले साडेसहा लाख मिळाले

googlenewsNext

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नेपाळ येथील व्यापारी राजाराम मुक्तीनाथ रेग्मी यांना चांदवड येथील कांदा व्यापारी संशयित राहुल चौधरी याने ‘स्वस्तात कांदा देतो’ असे सांगून राजाराम यांच्याकडून चौधरी याने सुमारे साडेसहा लाख रुपये ऑनलाइन स्वत:च्या खात्यावर जमा करून घेतले; मात्र त्यानंतर चौधरी याने त्यांना कांदाही पाठविला नाही आणि बँक खात्यात राजाराम यांनी जमा केलेली रक्कमही पुन्हा परत केली नाही. याबाबत वारंवार मागणी करूनही रक्कम मिळत नसल्याने, तसेच चौधरी याने दिलेले धनादेशही बँकेत वटले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, राजाराम यांना दिघावकर यांच्या मोहिमेबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी मंगळवारी (दि.१६) त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. या अर्जाची तत्काळ दखल घेत लासगाव पोलिसांना तपासाचे आदेश दिले.

---इन्फो--

पोलिसांच्या तत्परतेमुळे वाढला महाराष्ट्राचा नावलौकिक

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ निमसे यांच्या पथकाने तक्रार अर्जाची शहानिशा करीत चौधरी यांच्याशी संपर्क साधला व त्यास पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. यावेळी पोलिसांनी ‘खाक्या’दाखविताच व्यापारी चौधरी याने तातडीने राजाराम यांना त्यांच्याकडून घेतलेली सहा लाख ५० हजार रुपयांची रक्कम परत केली. पोलिसांनी घेतलेली कठोर भूमिका घेत दाखविलेल्या तत्परतेमुळे परदेशी व्यापाऱ्याची झालेली फसवणुकीची रक्कम पुन्हा त्याच्या पदरात पडली. यामुळे नक्कीच नेपाळस्थित राजाराम यांच्या मनात महाराष्ट्र पोलिसांविषयी चांगली प्रतिमा निर्माण झाली असेल.

Web Title: Nepal's onion trader got Rs 6.5 lakh drowned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.