मामाच्या जागी भाचा कामावर; मका गेलाच नाही काट्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:15 AM2021-03-05T04:15:27+5:302021-03-05T04:15:27+5:30
त्याचे झाले असे, की दि. २ मार्च रोजी दुपारी ४ वाजता शेतकरी सुरेश राजाराम पगार हे मका विक्रीसाठी कळवण ...
त्याचे झाले असे, की दि. २ मार्च रोजी दुपारी ४ वाजता शेतकरी सुरेश राजाराम पगार हे मका विक्रीसाठी कळवण बाजार समितीत गेले असता , लिलाव सायंकाळी ५ वाजता उशिराने सुरू करण्यात आला. लिलाव झाल्यानंतर मक्याच्या वजनासाठी बाजार समितीच्या वजन काट्यावर ते गेले असता काटा बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले . त्यावेळी तेथे हजर असलेल्या व्यक्तीला (नाव माहीत नाही ) काट्याबाबत विचारणा केली परंतू त्याने ‘लाईट नाही, इन्व्हर्टर चार्ज नाही, तुमच्या मालाचे वजन बाहेरुन करून घ्या...’ अशी उडवाउडवीची उत्तरे देत अपमानास्पद वागणूक दिली. तो नवखा दिसून आल्याने त्याची चौकशी केली असता त्याने सांगितले की , मी माझ्या मामाच्या जागी कामावर आलो असल्याचे सांगितले. बाजार समितीशी संबंधित नसलेली व कुठल्याही कामाची माहिती नसलेली व्यक्ती कामावर आल्याने बाजार समितीची गत ‘आवो जावो घर तुम्हारा’अशी झाल्याचे हे बोलके उदाहरण आहे. या प्रकाराची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी सुरेश पगार यांनी निवेदनात केली आहे.
कोट...
संबधित शेतकऱ्यांचा अर्ज कार्यालयास प्राप्त झाला आहे. सदर घटनेची चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल.
- रवींद्र हिरे, सचिव, बाजार समिती, कळवण