'पुढच्या वर्षी लवकर ये रे बाबा... अन् वेळत परत जा...', अखेर 'मान्सून'ने घेतला देशाचा निरोप

By अझहर शेख | Published: October 23, 2022 06:55 PM2022-10-23T18:55:40+5:302022-10-23T18:56:06+5:30

नेटिझन्सने सोशल मिडियावर नैऋुत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनला निरोप दिला आहे. 

 Netizens have said goodbye to the southwest Monsoon on social media  | 'पुढच्या वर्षी लवकर ये रे बाबा... अन् वेळत परत जा...', अखेर 'मान्सून'ने घेतला देशाचा निरोप

'पुढच्या वर्षी लवकर ये रे बाबा... अन् वेळत परत जा...', अखेर 'मान्सून'ने घेतला देशाचा निरोप

Next

नाशिक : 'पुढच्या वर्षी लवकर ये, अन् वेळेवर परत जा...' अशा शब्दांत नेटिझन्सने सोशल मिडियावर नैऋुत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनला निरोप दिला. रविवारी (दि.२३) देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतल्याचे हवमान खात्याचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवर जाहीर केले. मान्सून देशाच्या उर्वरित सर्व भागातून परतला आहे. यामुळे बळीराजाला हा मोठा दिलासा आहे. यावर्षी नाशिकमध्ये देखील विक्रमी पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यांत पावसाने यापुर्वीचे सर्वच आकड्यांना मागे टाकले. या हंगामात सुमारे १,२१९.५ मिमी इतका पाऊस नाशिक शहरात सप्टेंबरअखेरपर्यंत झाल्याची नोंद पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राकडून करण्यात आली आहे.

 कधी नव्हे तो इतका यावर्षी सप्टेंबर महिन्यात ३१७.२ मिमी इतका उच्चांकी पाऊस पडला. जून महिन्यात शंभरीदेखील न गाठलेल्या पावसाने जुलैमध्ये थेट पाच शतक ठोकले. ११ ते १२ जुलै दरम्यान २४ तासांत शहरात सर्वाधिक ९७.४ मिमी इतका पाऊस पडला होता. हा पाऊस हंगामाातील उच्चांकी ठरला. नाशिकमध्ये २०१९सालानंतर यावर्षी सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत १७५.८ मिमी इतका पाऊस पडला आहे.

'सीतरंग'ने चुकविला होता ठोका
परतीच्या पावसामुळे ओला दुष्काळसदृश्य स्थती ओढावली होती. दिपावलीच्या तोंडावर बंगालच्या उपसागरामध्ये ‘सीतरंग’नावाचे चक्रीवादळ घोंगावू लागल्याने पुन्हा एकदा काळजाचा ठोका चुकला; मात्र त्यातच मान्सूनने देशाच्या उर्वरित भागातूनसुद्धा माघार घेतल्याची वार्ता हवामान खात्याकडून आल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला.

परतीच्या प्रवासात जोरदार 'तडाखा' 
मान्सूनने परतीच्या प्रवासात जोरदार तडाखा दिला. सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतपीकांची मोठी नासाडी झाली. यामुळे बळीराजाचा मोठा हिरमोड झाला; मात्र मान्सून देशातील उर्वरित भागातूनदेखील बाहेर पडल्याचे हवामान खात्याने सांगितले आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना निसर्गाकडून एकप्रकारे ‘गिफ्ट’ मिळाले. २४ तासांत कोकणातील दोन शहरे वगळता राज्यात कोठेही पावसाची नोंद रविवारी झाली नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

 

Web Title:  Netizens have said goodbye to the southwest Monsoon on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.