‘नेट’साठी यावर्षी एनटीएतर्फे आॅनलाइन परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:42 AM2018-12-16T00:42:29+5:302018-12-16T00:42:44+5:30
विद्यापीठातील सहायक प्राध्यापक व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा आता आॅनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून सीबीएसर्फे घेतली जाणारी ही परीक्षा यंदाच्या वषार्पासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेतली जाणार आहे. दि. १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत दोन सत्रात परीक्षा होणार आहे.
नाशिक : विद्यापीठातील सहायक प्राध्यापक व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा आता आॅनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून सीबीएसर्फे घेतली जाणारी ही परीक्षा यंदाच्या वषार्पासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेतली जाणार आहे. दि. १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत दोन सत्रात परीक्षा होणार आहे.
नेट परीक्षेचे स्वरूप या वर्षापासून बदलण्यात आले आहे. नेट परीक्षा आता दोन पेपरची होणार असून, पहिल्या पेपरसाठी १०० गुणांसाठी ५० प्रश्न राहणार असून, प्रत्येकी दोन गुणांसाठी प्रश्न असतील. दुसरा पेपर विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या विषयाशी संबंधित राहणार असून, यामध्ये दोनशे गुणांसाठी १०० वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत. एनटीएच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज केल्यानंतर १९ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांना आॅनलाइन अॅडमिट कार्ड उपलब्ध करून देण्यात आले असून, परीक्षेपूर्वी ते संकेतस्थळावरून डाउनलोडकरून परीक्षेसाठी जाताना सोबत ठेवावे लागणार आहे.