जीवनात कधीही स्वाक्षरी मागू नका : कपिल देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 12:59 AM2022-05-04T00:59:33+5:302022-05-04T01:00:07+5:30

जीवनात कधीही स्वाक्षरी मागू नका तर स्वतःच्या कर्तृत्वाने इतके मोठे व्हा की,तुमची स्वाक्षरी लोकांनी मागितली पाहिजे,असे प्रतिपादन भारताचे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव यांनी अशोका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद दरम्यान सांगितले.

Never ask for signature in life: Kapil Dev | जीवनात कधीही स्वाक्षरी मागू नका : कपिल देव

जीवनात कधीही स्वाक्षरी मागू नका : कपिल देव

googlenewsNext
ठळक मुद्देअशोक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

नाशिक : जीवनात कधीही स्वाक्षरी मागू नका तर स्वतःच्या कर्तृत्वाने इतके मोठे व्हा की,तुमची स्वाक्षरी लोकांनी मागितली पाहिजे,असे प्रतिपादन भारताचे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव यांनी अशोका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद दरम्यान सांगितले.

शनिवारी एका समारंभासाठी नाशिकला आले असताना कपिल देव यांनी अशोका ग्रुप ऑफ स्कूलच्या अर्जुन नगर कॅम्पसला भेट दिली,याठिकाणी उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्याशी त्यांनी आपल्या जीवन प्रवासासंदर्भांत दिलखुलास संवाद साधला. ते म्हणाले, आज सर्वच आई- वडिलांना वाटते की,माझ्या मुलाने डॉक्टर इंजिनिअर व्हायला हवे ते चुकीचे नाही प्रत्येक आई-वडिलांना मुलाचे चांगलेच हवे असते. तुम्ही काहीही करा,परंतु एका खेळाडू वृत्तीने जीवन जगायला शिका जीवनात यश अपयश येतच राहतील परंतु

निराश न होता कर्म करत रहा यश नक्कीच मिळेल. आपली आवड कशात आहे हे ओळखायला शिकले पाहिजे आणि त्या क्षेत्रात प्रचंड मेहनत करून यश आपलेसे केले पाहिजे असे ते म्हणाले. जीवन जगताना सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला आजही आठवते, करिअरच्या सुरुवातीला इंग्रजीच काय मला व्यवस्थित बोलताच येत नव्हते. परंतु मी शिकायचे ठरवले आणि त्याचा परिणाम आज तुम्ही बघताच आहात. असेही कपिल देव यांनी सांगितले. यावेळी अशोका बिल्डकॉनचे संचालक आशिष कटारिया आणि अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे सचिव, श्रीकांत शुक्ला यांनी कपिल देव यांचा सत्कार केला. याप्रसंगी मुख्याध्यापिका अपर्णा मठकरी,उपप्राचार्य प्रिया डिसूझा, प्रशासक नरेंद्र तेलरांडे , प्राचार्य सुदिप्ता दत्ता उपाध्यक्ष अनुत्तमा पंडित आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

चौकट-

मी जन्मालाच आलो नसतो

एका विद्यार्थ्याने आपण जर क्रिकेटपटू झाला नसता तर,काय व्हायला आवडले असते? असे विचारल्यानंतर त्वरित कपिल देव म्हणाले, मी जन्मालाच आलो नसतो स्वतःच्या आवडीवर विश्वास ठेवून प्रचंड मेहनत

करून एका क्षेत्रात झोकून द्या बाकी कोणताही विचार करू नका कसून मेहनत घेतल्यावर कोणत्याही क्षेत्रात यश हे आहेच. असे त्यांनी सांगितले.

Web Title: Never ask for signature in life: Kapil Dev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.