नवीन १८७० बाधित; ३० बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:13 AM2021-05-17T04:13:39+5:302021-05-17T04:13:39+5:30
नाशिक : जिल्ह्यात रविवारी ( दि. १६) नवीन १८७० कोरोनाबाधित झाले असून, एकूण २८६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी ...
नाशिक : जिल्ह्यात रविवारी ( दि. १६) नवीन १८७० कोरोनाबाधित झाले असून, एकूण २८६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी जिल्ह्यात ३० जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४१००वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या गत आठवडाभरापासून सातत्याने बाधितांच्या तुलनेत अधिक रहात आहे. त्यामुळेच रविवारी एकूण उपचारार्थी रुग्णांच्या संख्येत अजून घट होऊन ही संख्या १८,१०४ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ९१६, नाशिक ग्रामीणला ९१४ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ४० रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १३, ग्रामीणला १६, मालेगाव मनपा १, असा एकूण ३० जणांचा बळी गेला आहे.
इन्फो
उपचारार्थी १८ हजारांवर
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सातत्याने अधिक राहात असल्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या १८,१०४वर पोहोचली आहे. त्यात ७९२९ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, ८७५६ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, १३६४ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य ५५ रुग्णांचा समावेश आहे.
इन्फो
कोरोनामुक्तचे प्रमाण ९४ टक्क्यांवर
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ९४ टक्क्यांवर पाेहाेचली आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९६.९७ टक्के, नाशिक शहर ९५.५४, नाशिक ग्रामीण ९२.१३, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८६.४२ टक्क्यांवर पाेहोचला आहे.