ओझर येथे नवीन २१ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 10:35 PM2021-05-08T22:35:43+5:302021-05-09T00:15:03+5:30
ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या आठ-दहा दिवसांपासून घटत असल्याने ओझरकरांना दिलासा मिळत आहे.
Next
ठळक मुद्दे १२४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला
ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या आठ-दहा दिवसांपासून घटत असल्याने ओझरकरांना दिलासा मिळत आहे. शनिवारी २१ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आता ओझरसह परिसरातील कोरोनाबाधित रुग्ण संख्या एकूण ४,३३० झाली आहे. १२४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून, ३,९७० रुग्ण बरे झाले आहेत, तर २४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २२२ रुग्ण घरीच क्वारंटाइन होऊन उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.