दळवट आरोग्यवर्धिनी केंद्राला नवीन रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:37+5:302021-06-16T04:18:37+5:30

दळवट व परिसरातील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन दळवट आरोग्यवर्धिनी केंद्राला अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी ही ...

New ambulance to Dalwat Arogya Vardhini Kendra | दळवट आरोग्यवर्धिनी केंद्राला नवीन रुग्णवाहिका

दळवट आरोग्यवर्धिनी केंद्राला नवीन रुग्णवाहिका

googlenewsNext

दळवट व परिसरातील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन दळवट आरोग्यवर्धिनी केंद्राला अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी ही मागणी अनेक दिवसांपासून होती. आमदार नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर दळवट आरोग्यवर्धिनी केंद्राला रुग्णवाहिका मिळाली.

जिल्हा परिषदेकडून नवीन रुग्णवाहिका मागणीसाठी अनेक प्रस्ताव पाठविले होते. परंतु एकही रुग्णवाहिका मिळाली नव्हती. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये आमदार नितीन पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन कळवण तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्र, ४९ उपकेंद्र व सुरगाणा तालुक्यातील ८ आरोग्य केंद्र व ३८ उपकेंद्रासाठी नवीन रुग्णवाहिकांची मागणी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात कळवण मतदारसंघात ३ रुग्णवाहिका मिळाल्या असून त्यात दळवट येथे रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे . यावेळी सरपंच रमेश पवार, यशवंत पवार आदींसह आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

कोट....

दळवट आरोग्यवर्धिनी केंद्रासह उपजिल्हा रुग्णालय व सुरगाणा तालुक्यात एक अशा ३ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. पुढील टप्प्यात दोन्ही तालुक्यात रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न चालू आहेत.

- नितीन पवार, आमदार

फोटो - १४ दळवट ॲम्ब्युलन्स

दळवट आरोग्यवर्धिनी केंद्राच्या नवीन रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी आमदार नितीन पवार, जयश्री पवार, रमेश पवार, यशवंत पवार आदी.

===Photopath===

140621\14nsk_15_14062021_13.jpg

===Caption===

फोटो - १४ दळवट ॲम्बुलन्स दळवट आरोग्य वर्धिनी केंद्राच्या नवीन रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी आमदार नितीन पवार, जयश्री पवार, रमेश पवार, यशवंत पवार आदी. 

Web Title: New ambulance to Dalwat Arogya Vardhini Kendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.