जिल्ह्यात २२५ अंगणवाड्यांना नवीन इमारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:26 AM2021-02-06T04:26:00+5:302021-02-06T04:26:00+5:30
शुक्रवारी महिला व बालकल्याण समितीची मासिक बैठक सभापती अश्विनी आहेर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी कुपोषित बालकांचा आढावा घेण्यात ...
शुक्रवारी महिला व बालकल्याण समितीची मासिक बैठक सभापती अश्विनी आहेर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी कुपोषित बालकांचा आढावा घेण्यात येऊन जानेवारी, २०२१ अखेर नाशिक जिल्ह्यात मध्यम कुपोषित १,९५७ व तीव्र कुपोषित बालके ३३४ असल्याचे सांगण्यात आले. अंगणवाडीसेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडीसेविका रिक्तपदाचा आढावा घेतला असता, त्यात जिल्ह्यात २४१ अंगणवाडीसेविका, ९६४ अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडीसेविकेची २३ रिक्त पदे आहेत. शासनाने अंगणवाडीसेविका मदतनीस भरती प्रक्रिया राबविण्यास परवानगी दिलेली असल्याने, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, असे आदेश सभापती आहेर यांनी आदेश दिले.
जिल्हा नियोजना समितीमार्फत आदिवासी विभागातील अंगणवाडी केद्रांना नवीन इमारती बांधकामासाठी चालू आर्थिक वर्षात १० कोटी निधी मंजूर असल्याने, आदिवासी भागातील १५९ अंगणवाडी केंद्रांना व बिगर आदिवासी क्षेत्रासाठी ६६ अंगणवाडी केंद्रांना नवीन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली. त्यात उघड्यावरील, समाज मंदिरात भरणाऱ्या केंद्रांना प्राधान्य देण्यात आलेले आहे, असे सभापती अश्विनी आहेर यांनी सांगितले. या बैठकीस गणेश अहिरे, कविता धाकराव, रेखा पवार, सुनिता सानप, गीतांजली पवार-गोळे, कमल आहेर, शोभा बरके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे उपस्थित होते.
(फोटो ०५ महिला)- महिला बाल कल्याण समितीच्या बैठकीत बोलताना सभापती अश्विनी आहेर, समवेत समिती सदस्य व अधिकारी.