मनमाड, नांदगाव नगर परिषदेला नवीन मुख्याधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 06:18 PM2020-07-28T18:18:33+5:302020-07-28T18:22:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदगाव : तालुक्यातील मनमाड व नांदगाव नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या बदल्या होऊन, त्याजागी नवीन मुख्याधिकारी नेमणुका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : तालुक्यातील मनमाड व नांदगाव नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या बदल्या होऊन, त्याजागी नवीन मुख्याधिकारी नेमणुका झाल्या आहेत. मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्या जागी विजयकुमार मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नांदगांव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती श्रिया कुरणावळ-देवचके यांच्या जागेवर पंकज गोसावी यांची बदली करण्यात आली आहे. मनमाडचे मुख्याधिकारी मेनकर यांची बदली झाल्याने ते पद रिक्त झाले होते.
मनमाड शहरात कोरोनाचे रु ग्ण वाढत असतांना मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. मेनकर यांची अचानक सिन्नर येथे बदली झाल्यामुळे शासनाने मनमाड शहराला वाऱ्यावर सोडल्याची भावना जनतेत निर्माण झाली होती. मनमाड येथे लवकरात लवकर मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी जनतेतून मागणी होत होती. विजयकुमार मुंडे पारोळा नगर परिषदेचे व पंकज गोसावी निफाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नियोजन व उपाय योजना करण्याच्या दृष्टीकोनातून दोनही शहरांना मुख्याधिकारी मिळाल्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.