गाव समिती स्थापून कोरोनाविरुद्ध सरसावले नवी बेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 09:26 PM2020-03-31T21:26:05+5:302020-03-31T21:26:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कळवण : कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नवी बेज गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समिती स्थापन केली आहे. या प्रकारचा निर्णय घेणारे नवी बेज हे राज्यातील पहिलेच गाव मानले जात आहे.

New committee formed against village Corona by setting up village committee | गाव समिती स्थापून कोरोनाविरुद्ध सरसावले नवी बेज

नवी बेज येथे शुकशुकाट.

Next
ठळक मुद्देराज्यातील पहिलेच गाव : दंडात्मक कारवाईचा नियम, शंभर टक्के लॉकडाउन

मनोज देवरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नवी बेज गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समिती स्थापन केली आहे. या प्रकारचा निर्णय घेणारे नवी बेज हे राज्यातील पहिलेच गाव मानले जात आहे.
कोरोना प्रतिबंध समितीने नवी बेज गावकऱ्यांसाठी नियमावली तयार केली आहे. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करून शंभर टक्के लॉकडाउन करण्याचा निर्धार केला आहे. शिवाय बाहेरगावाहून आलेल्यांना घरातच बसण्याची सूचना करून संपूर्ण गाव लॉकडाउन केल्यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट आहे. याबाबत सोमवारी प्रगतिशील शेतकरी घनश्याम पवार यांच्या अध्यक्षतेखाली नवी बेज ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत गाव शंभर टक्के लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवी बेज गावातून पुणे, मुंबई यांसारख्या शहरात कामासाठी गेलेले गावकरी गावाकडे येत आहेत. गावात आलेल्या या गावकºयांची नोंद घेण्यात आली असून, त्याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. शिवाय घराबाहेर पडू नका अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.
या बैठकीत कोरोना प्रतिबंध समितीच्या अध्यक्षपदी घनश्याम पवार यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सखाराम गोधडे, उपसरपंच तथा मविप्र संचालक अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीसपाटील, व्यावसायिक व ग्रामस्थ उपस्थित होते.बैठकीत घेतले निर्णय गावकºयांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन नवी बेज कोरोना प्रतिबंध समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, त्यात ग्रामस्थांनी वारंवार हात धुणे, शिंकताना व खोकताना तोंडाला रु माल, मास्क बांधणे, घरासमोर व दारासमोर साबण व पाण्याची बादली भरून ठेवणे, बाहेरून आल्यानंतर घरात जाण्यापूर्वी हात, पाय, तोंड साबणाने धुणे, गावात अनावश्यक फिरू नये, गावात घोळका करून बसू नये, आपापल्या घरात थांबावे, घराची व परिसराची रोज साफसफाई करावी, सर्दी-खोकला-ताप आल्यास तत्काळ डॉक्टरांना भेटावे, गावात बाहेरून आलेल्या नागरिकांनी घरात थांबावे व कुटुंबातील व्यक्तीपासून दूर राहावे, भाजीपाला, किराणा, औषधे यांची योग्य दराने विक्र ी करताना ग्राहकांनी वस्तू घेताना सामाजिक अंतर ठेवावे, नियमांचे पालन केले नाही तर नियुक्त स्वयंसेवक दंडात्मक कारवाई करतील, सार्वजनिक जागेवर व ओट्यावर बसून गप्पा मारणे बंद करावे, गावात अवैध दारू विक्र ी बंद करावी, असे निर्बंध लादण्यात आले आहेत. सूचना व नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Web Title: New committee formed against village Corona by setting up village committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.