वंचित बहुजन आघाडीची नूतन कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:18 AM2021-09-08T04:18:51+5:302021-09-08T04:18:51+5:30
त्र्यंबकेश्वर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ...
त्र्यंबकेश्वर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्यातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी महिला तालुकाध्यक्षा सोनम गांगुर्डे उपस्थित होत्या. या कार्यकारिणीमध्ये त्र्यंबकेश्वर शहराध्यक्षपदी मोहन सोनवणे, महिला शहराध्यक्षा पुष्पाताई तिवडे, आदिवासी आघाडी तालुकाध्यक्षपदी संपत चहाळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकाध्यक्ष संपत गांगुर्डे, शहराध्यक्ष अविनाश जाधव, हरसूल गट प्रमुख कृष्णा काशीद, अंजनेरी गटप्रमुख हरिष तुपलोंढे, वाघेरा गण प्रमुख राम जाधव, तालुका उपाध्यक्षपदी सक्रू शिद, सरचिटणीस श्यामराव कोथमिरे, तालुका संघटक अनिल गांगुर्डे, योगेश रोकडे, सहसरचिटणीस अमोल गांगुर्डे आदींना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी संत चोखामेळा ट्रस्ट अध्यक्ष जयप्रकाश डोळस, शंकरा गोटे, सोमा सिद राहुल गांगुर्डे, ज्ञानेश्वर भास्कर भालेराव, सुनंदा गांगुर्डे, मनीषा सोनवणे, पूनम भालेराव, भूषण सोनवणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.