पक्षी संमेलन गाठणार नवीन उंची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 11:39 PM2018-10-04T23:39:41+5:302018-10-04T23:40:06+5:30

नाशिक : दरवर्षी विविध जातींचे देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांची नांदूरमधमेश्वरला हिवाळ्यात पसंती ठरलेली असते. त्यांचे आगमनाला यावर्षी लवकरच सुरुवात झाली आहे. विविध प्रकारचे बदक व करकोचे जलाशयाच्या पात्रात पाहुणचार घेत असतानाच ज्या पक्ष्यांचे नेहमीच आकर्षण व उत्सुकता असते तो म्हणजे मोठा रोहितदेखील (फ्लेमिंगो) यंदा अभयारण्यात पोहचला आहे, हे विशेष!

New height to reach bird gathering | पक्षी संमेलन गाठणार नवीन उंची

पक्षी संमेलन गाठणार नवीन उंची

Next
ठळक मुद्देशुभ वर्तमान : नांदूरमधमेश्वरला फ्लेमिंगोचे आगमन

अझहर शेख।
नाशिक : दरवर्षी विविध जातींचे देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांची नांदूरमधमेश्वरला हिवाळ्यात पसंती ठरलेली असते. त्यांचे आगमनाला यावर्षी लवकरच सुरुवात झाली आहे. विविध प्रकारचे बदक व करकोचे जलाशयाच्या पात्रात पाहुणचार घेत असतानाच ज्या पक्ष्यांचे नेहमीच आकर्षण व उत्सुकता असते तो म्हणजे मोठा रोहितदेखील (फ्लेमिंगो) यंदा अभयारण्यात पोहचला आहे, हे विशेष!
निफाड तालुक्यातील चापडगाव शिवारात असलेल्या नांदूरमधमेश्वर राष्टÑीय पक्षी अभयारण्यात यंदा हिवाळी पक्ष्यांचे संमेलन चांगलीच उंची गाठणार असल्याचे दिसत आहे. कारण आतापर्यंत पक्ष्यांची संख्या २० हजारांच्या पुढे गेल्याचे नाशिक वन्यजीव विभागाने सांगितले. आठवडाभरापूर्वी पक्षी प्रगणना करण्यात आली. मूळ आफ्रिकेचा असलेला पाहुणा फ्लेमिंगो यंदा नांदूरमधमेश्वरला दाखल झाल्याने पक्षिमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. फ्लेमिंगो बघण्यासाठी या वीकेंडला पर्यटकांची गर्दी होण्याची चिन्हे आहेत.
ठाण्याजवळील शिवडीचा समुद्रकिनारा, बारामतीजवळ भिगवण येथील उजनी धरणाचे जलाशयावरही फ्लेमिंगो दरवर्षी पहावयास मिळतात. मात्र मागील तीन वर्षांपासून फ्लेमिंगो नांदूरमधमेश्वर अभयारण्याकडे फिरकणे पसंत करत नसल्याने पर्यटकांची निराशा होत होती.
मागील वर्षी दोन दिवसांसाठी वाट चुकलेगेल्या वर्षी अवघ्या दोन दिवसांसाठी केवळ दोन फ्लेमिंगो नांदूरमधमेश्वरची वाट चुकले होते. दोन दिवसांनंतर त्यांनी स्थलांतर करणे पसंत केले, त्यानंतर मात्र संपूर्ण हंगामात फ्लेमिंगो नजरेस पडले नाहीत. यंदा नऊ फ्लेमिंगो येथील जलाशयावर विहार करताना पहावयास मिळत आहे. बंधाऱ्याचे पाणी कमी झाल्यामुळे शेवाळासह खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने फ्लेमिंगो येथे मुक्कामी उतरल्याचे पक्षी अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.यांची प्रतीक्षालालशिर (रेड कस्टर्ड पोचार्ड), शेंडी बदक (टस्टेड पोचार्ड), सामान्य करकोचा, श्याम कादंब (ग्रे लॅग गूस), पांढरा बलाक (व्हाइट स्टॉर्क) या बोटावर मोजण्याइतक्या विदेशी पाहुण्यांची अद्याप प्रतीक्षा आहे. उर्वरित देशी पक्षी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. तसेच बहुतांश विदेशी प्रजातीच्या पक्ष्यांचेही प्रमाण अधिक वाढले आहे.

Web Title: New height to reach bird gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.