पावणे दोनशे वृद्धांच्या आयुष्यात नव्याने ‘प्रकाश’ - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:13 AM2021-03-14T04:13:56+5:302021-03-14T04:13:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कळवण : गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाची साथ पसरली तशा नेत्र शल्यचिकित्सा थांबल्या होत्या. कोरोनाबाधितांचे प्रमाण ओसरल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाची साथ पसरली तशा नेत्र शल्यचिकित्सा थांबल्या होत्या. कोरोनाबाधितांचे प्रमाण ओसरल्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुन्हा सुरू झाल्या आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांत जिल्ह्यातील १७६ वृद्धांना नव्याने दृष्टीचा लाभ प्राप्त झाला असून, हे राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाचे यशच म्हणायला हवे.
केवळ कळवण, सुरगाणा, देवळा सटाणा या तालुक्यांतीलच नव्हे; तर धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरजवळच्या देशशिरवाडे या एकाच गावच्या सुमारे १०-१२ वृद्धांनी मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करवून घेतली आहे. शस्त्रक्रियेपश्चात सेवेबद्दलही या रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे. कोरोना महामारीच्या काळात दंत चिकित्सासारख्या तपासणीला मर्यादा आल्या असताना, दवाखान्यात प्रवेश करावा की नाही, याबाबत सामान्य जनता काहीशी साशंक आहे.
अशाही परिस्थितीत कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयात काहीसे आशादायक चित्र आहे. कळवण उपजिल्हा रुग्णालयाने डॉ. शरदसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम करून दाखवले आहे.
इन्फो...
डिसेंबर २०२० ते १० मार्च २०२१ दरम्यानची तालुकानिहाय आकडेवारी
तालुका - लाभार्थी
कळवण - ७१
इगतपुरी - ७
दिंडोरी - ११
त्र्यंबकेश्वर - २४
सटाणा - ४५
देवळा -१७
नांदगाव - १
एकूण लाभार्थी - १७६
राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या या शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरदसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अनिता लाड करत आहेत. यासाठी त्यांना नेत्रचिकित्सा अधिकारी प्रमोद गजबे, शस्त्रक्रियागृहाच्या परिसेविका पंचाक्षरी, परिचारिका वाढणे, पवार, परिचारक योगेश यांचे सहकार्य मिळत आहे.
इन्फो... यांची भूमिका मोलाची
नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया पूर्वतपासणीसाठी डॉ. प्रल्हाद चव्हाण, शस्त्रक्रियेदरम्यान भूलतज्ज्ञ डॉ. शारदा गावीत , डॉ. शारदा चव्हाण, डॉ. शशिकांत आवारी, डॉ. गोंधळे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पराग पगार, परिचारिका ज्योती वाढणे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अनिता लाड या आवर्जून नमूद करतात.
कोट...
कोरोना काळात अजूनही नाशिक जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, मालेगाव आणि उपजिल्हा रुग्णालय, कळवण येथेच राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुरू आहेत. ही माझ्यासाठी व कळवण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. अधिकाधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा.
- डॉ. शरदसिंग परदेशी,
वैद्यकीय अधीक्षक, कळवण
फोटो - १२ डॉ. शरदसिंग परदेशी
-
१२कळवण १
कळवण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची तपासणी नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अनिता लाड यांनी केली.
===Photopath===
120321\194612nsk_54_12032021_13.jpg~120321\194612nsk_55_12032021_13.jpg
===Caption===
डॉ. शरदसिंग परदेशी~कळवण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची तपासणी करतांना नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अनिता लाड.